CBSE 10th Result 2022 : १२वी पाठोपाठ CBSE १० वी निकाल जाहीर

    22-Jul-2022
Total Views |
 
CBSE 10th Result 2022 (Image Source : Internet)
 
 
नवी दिल्ली :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावी पाठोपाठ आता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकालही जाहीर केला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्यानंतर बोर्डाने १० वीचा निकाल जाहीर केला. सीबीएसईने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालानुसार, यावर्षी एकूण ९४.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 
 
 
 
सीबीएसईने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालानुसार, यावर्षी एकूण ९४.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण २१ लाख ०९ हजार २०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २० लाख ९३ हजार ९७८ विद्यार्थी परीक्षेला बसले. तर १९ लाख ७६ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 
यावर्षी १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी सीबीएसईच्या cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. याशिवाय डिजिलॉकर आणि उमंग ॲपवरही निकाल उपलब्ध आहे.
 
यावर्षी CBSE ने कोरोना महामारीचा उद्रेक लक्षात घेता १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षा टर्म-१ आणि टर्म-२ अशा दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. १० वी टर्म-२ बोर्डाची परीक्षा २६ एप्रिल २०२२ ते २४ मे २०२२ या कालावधीत देशभरातील हजारो केंद्रांवर घेण्यात आली. CBSE ने बोर्ड परीक्षेच्या अंतिम निकालात विद्यार्थ्यांना थिअरी पेपरमध्ये टर्म-१ चे ३० टक्के गुण आणि टर्म-२ मधून ७० टक्क्यांचे वेटेज दिले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षेत दोन्ही टर्मचे ५०-५० टक्के गुण जोडण्यात आले आहेत.
 
येथे टॉप्स १० वीचा निकाल
 
असा तपास तुमचा निकाल
१. विद्यार्थ्यांनी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जावे.
२. आता होम पेजवर दिसणार्‍या १०वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
३. आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
४. येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका आणि सबमिट करा.
५. आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
६. निकाल डाउनलोड करा आणि पुढील कामासाठी त्याची प्रिंट काढा.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.