आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे रानिल विक्रमसिंघे नवे राष्ट्रपती

20 Jul 2022 18:30:56
कोलंबो:
राजकीय संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आता नवीन राष्ट्रपती मिळाले आहे. रानिल विक्रमसिंघे हे देशाचे नवे राष्ट्रपती असणार आहेत. आतापर्यंत ते कार्यवाह अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहत होते. 
ranil wikramsinghe(pic-@tw) 
 
राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत रानिल विक्रमसिंघे यांचा सामना श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) च्या दुल्लास अल्हप्पारुमा आणि जनता विमुक्ती पेरामुना (JVP) च्या अनुरा कुमारा डिसनायके यांच्याशी होता. श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या ४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत झाली. मात्र, आता नव्या सरकारसमोर श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आहे.
 
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे आठवे राष्ट्रपती
 
श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती निवडण्यासाठी संसदेत मतदान झाले. या मतदानात रनिल विक्रमसिंघे यांना १३४ मते मिळाली. दुल्लस अल्हप्पारुमा यांना 82 तर अनुरा कुमारा डिसनायके यांना केवळ 3 मते मिळाली. 223 खासदारांनी मतदान केले. 2 जणांनी मतदानात भाग घेतला नाही. 4 मते अवैध ठरली. त्यामुळे 219 मते वैध राहिली. ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीनंतर युनायटेड नॅशनल पार्टीच्या राष्ट्रीय यादीतून रानिल विक्रमसिंघे संसदेत पोहोचले होते. गोटाबाया राजपक्षे यांनी पद रिक्त ठेवल्यानंतर हे मतदान झाले. 14 जुलै 2022 रोजी त्यांनी राजीनामा दिला.
Powered By Sangraha 9.0