निकामी समजून तोफगोळा घेतला हातात अन्...

    19-Jul-2022
Total Views |
नागपूर:
युद्धभूमीत शत्रूवर मात करण्यासाठी ज्या शस्त्राची आवश्यकता असते त्याच शस्त्रांपैकी एक असणाऱ्या तोफगोळ्यातून अचानक स्फोट झाल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असणारा गंभीर जखमी झाला.
 

aayudh nimnani(प्रतीकात्मक चित्र)
मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव स्थित आयुध निर्मणी येथून लिलावात खरेदी करण्यात आलेले काही तोफगोळ्यांतील एक निकामी समजलेला तोफगोळा अचानक फुटला. ही घटना बाराद्वारी येथे घडली, ए. आर. ट्रेडर्स नावाच्या एका भंगाराचे गोदामात ही घटना घडली. या गोदामात पुलगाव येथील आयुध निर्मणीतुन निकामी दारूगोळा लिलावात विकत घेतला.
 
हा दारूगोळा कटरने कापून त्याचे लोखंड वेगळे करण्याचे काम सुरू असताना त्यातील एका तोफगोळ्याचा स्फोट झाला. त्यात गुड्डु भभूतलाल रतनेरे (वय ५२, उप्पलवाडी) हे जागीच ठार झाले. तर सुमीत सुकरलाल मरसकोल्हे (वय १९) हा जखमी झाला. त्याला दुर्गावती नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.