NSE च्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांना ईडीकडून अटक

    14-Jul-2022
Total Views |

chitra ramakrishna (Image Source : Internet)
 
नवी दिल्ली :
नॅशनल स्टोक एक्सचेंजच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी अटक केली आहे. अटकेनंतर न्यायालयाने चित्रा यांना ४ दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे. बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचार्‍यांची हेरगिरी करणाऱ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी ईडीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे, रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
 
 
 
 
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण हे एकेकाळी नॅशनल स्टोक एक्सचेंजचे उच्चस्तरीय अधिकारी होते. केंद्रीय तपास यंत्रणेने या सर्वांविरुद्ध पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या आठवड्यात सीबीआयने आरोपींविरुद्ध संबंधित एका प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने आरोप केला होता की, नारायण आणि रामकृष्ण यांनी मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या कंपनीला शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे टॅप केले होते. यानंतर ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.