...म्हणून गूगलचे हे डूडल आहे खास

13 Jul 2022 16:07:54
 
google doodle
 pic-google
 
न्यूयॉर्क:
एक काळ असा होता जेव्हा लोक फक्त विश्व कस असेल याची केवळ कल्पना करू शकत होते, परंतु आज ते वास्तवात संपूर्ण सृष्टीला बघू शकतात. जेडब्ल्यूएसटी म्हणजेच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप वरून नासाने घेतलेल्या आकाशगंगेच्या चित्रांमधून लोक विश्वाची वास्तविक प्रतिमा पाहू शकतात. ही चित्रे खरोखरच विश्वाचे हृदयस्पर्शी सौंदर्य दाखवतात. या संदर्भात गुगलने आपले एक खास डुडल वापरकर्त्यांसाठी आणले आहे. ज्यात त्याने याच विश्वाच्या सौंदर्याचे संपूर्ण चित्र दाखवले आहे.
 
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेले विश्‍वाचे पहिले रंगीत छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हे छायाचित्र प्रसिद्ध केले. यावेळी बोलताना विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याची प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली. १३ अब्ज वर्षांपूर्वीच्या बिग बँगनंतर तयार झालेल्या विश्‍वाचे हे पहिले रंगीत छायाचित्र आहे.
 
 
या संदर्भात बोलताना नासाचे प्रशासक बिल नेल्सन म्हणाले, आम्ही १३ अब्ज वर्षांहून अधिक मागे वळून पाहत आहोत. या लहान कणांपैकी एकावर तुम्हाला दिसणारा प्रकाश १३ अब्ज वर्षांपासून प्रवास करत आहे. यामुळे तो बिग बँगपेक्षा फक्त ८०० दशलक्ष वर्षे लहान आहे. हे असे दृश्य आहे जे आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.
Powered By Sangraha 9.0