पावसाळा सुरु होतोय; बनवा कुरकुरीत कांदा भजी

14 Jun 2022 19:55:04

bhaje
(Image Source : Internet) 
 
 
कुरकुरीत कांदा भजी 
 
 
साहित्य :
 
१० वाट्या कांद्याचे पातळ काप,
२-३ वाट्या डाळीचे पीठ,
१-२ चमचे लाल तिखट,
१ चमचा मीठ सुरुवातीला लावण्यासाठी (नंतर लागल्यास चवीनुसार)
तेल तळण्यासाठी,
किंचित पापडखार (पापडखाराने भाजी एकमेकांना चिटकत नाही, मात्र जास्त झाल्यास तेल पितात)
आवडीनुसार चिरलेली कोथिंबीर
 
कृती :
 
कांदा उभा चिरून त्याचे पातळ काप करून घ्यावेत. कांद्याच्या कापांना मोठं लावून २ तास ठेवावे. कांद्याला पाणी सुटेल. त्यात तिखट, कोथिंबीर, पापडखार घालून मावेल तेवढे डाळीचे पीठ कालवावे. हे मिश्रण खूप कोरडे नसावे व सरसरिताही नसावे. आधी कांद्यांना मीठ लावले आहे हे लक्षात घेऊन गरज असल्यास बेताने मीठ घालावे. एकीकडे तेल कढईत तापत ठेवावे. तेल कडकडीत तापल्यानंतर डावभर तेल भाज्यांच्या पिठात घालून मिसळावे. नंतर माध्यम आकाराची भाजी तळून प्लेटमध्ये गरमागरम सर्व्ह करावी.
 
Powered By Sangraha 9.0