स्त्रियांसाठी अधिक सुरक्षित अन् समावेशक इंटरनेट निर्माण करण्यास META प्रयत्नशील

    13-Jun-2022
Total Views |
मुंबई:
अत्याधुनिक काळात मेटाने महिलांसाठी एक सुरक्षित आणि अधिक समावेशक इंटरनेट तयार करण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांवर तसेच उपक्रमांवर प्रकाशझोत टाकला आहे. भारतात ऑनलाइन असणाऱ्या स्त्रियांची संख्या अद्यापही खूप कमी आहे, ही संख्या वाढण्यास मदत करायची असल्यास जिथे महिलांना कोणत्याही आव्हानांशिवाय ऑनलाइन अनुभवाचा आनंद घेत राहता येईल असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.

meta Image Source:meta
अत्याधुनिक काळात मेटाने महिलांसाठी एक सुरक्षित आणि अधिक समावेशक इंटरनेट तयार करण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांवर तसेच उपक्रमांवर प्रकाशझोत टाकला आहे. भारतात ऑनलाइन असणाऱ्या स्त्रियांची संख्या अद्यापही खूप कमी आहे, ही संख्या वाढण्यास मदत करायची असल्यास जिथे महिलांना कोणत्याही आव्हानांशिवाय ऑनलाइन अनुभवाचा आनंद घेत राहता येईल असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. हे उपक्रम महिलांना मराठीसह विविध स्थानिक भाषांतून साधने आणि संसाधने उपलब्ध करून देत त्यांना ऑनलाइन जगामध्ये अधिक चांगल्या प्रकारे वावरण्यासाठी तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील कम्युनिटीज आनंदाने वापरण्यासाठी सुसज्ज आणि सक्षम करतील.
विमेन्स सेफ्टी हब, मराठीमध्ये
मेटाच्या पहिल्या दोन उपक्रमांमध्ये विमेन्स सेफ्टी हब या सुविधेचा समावेश आहे, ज्यात व्हिडिओ-ऑन-डिमांड सुरक्षा प्रशिक्षण दिले जाणार असून व्हिजिटर्सना लाइव्ह सुरक्षा प्रशिक्षणासाठी रजिस्टर करता येणार आहे. यामुळे सोशल मीडियाच्या अनुभवाचा जास्तीत-जास्त वापर करण्यास मदत करणा-या साधनांविषयी व संसाधनांविषयीची माहिती मिळविणे भारतातील अधिकाधिक महिला यूजर्सना शक्य होणार आहे. हे सेफ्टी हब मराठीमध्ये आणि इतर ११ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे लक्षावधी महिलांना, विशेषत: इंग्रजी न बोलणा-या समुदायातील महिलांना ही माहिती सहजपणे मिळविताना भाषेचा अडथळा येणार नाही.

सहमतीशिवाय खासगी प्रतिमा प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यासाठी StopNCII.org
मेटाने अलीकडेच यूके रिव्हेन्ज पोर्न हेल्पलाइनच्या सहयोगाने StopNCII.org सुरू केले आहेत. भारतामध्ये या मंचाने सोशल मीडिया मॅटर्स, सेंटर फॉर सोशल रिसर्च आणि रेड डॉट फाउंडेशन यांसारख्या संघटनांशी भागीदारी केली आहे व यातून नॉन-कन्सेन्श्युअल इंटिमेट इमेजरी (एनसीआयआय) अर्थात सहमतीविना खासगी प्रतिमा प्रसारित करण्याच्या वृत्तीचा सामना करण्याची व तिला आळा घालण्याची ताकद महिलांना मिळणार आहे.
महिलांसाठी मेटाकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांना अधोरेखित करताना फेसबुक इंडिया (मेटा) च्या हेड ऑफ पॉलिसी प्रोग्राम्‍स अॅण्‍ड आऊटरिच मधू सिंग सिरोही, म्हणाल्या, "भारतामध्ये ८० कोटींहून अधिक इंटरनेट यूजर्स आहेत, पण त्यात महिलांचे प्रमाण फक्त ३३ टक्‍केआहे आणि लैंगिक विषमतेची ही दरी बुजविण्याची गरज आहे. महिलांसाठी केवळ सुरक्षितच नव्हे तर त्यांना मुक्तपणे व्यक्त होण्याची, शिकण्याची आणि आपला विकास साधण्याची संधी देणारा सर्वसमावेशक ऑनलाइन अवकाश निर्माण करण्यास मदत करू शकतील अशी साधने, कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्याच्या कामी मेटामध्ये आम्ही सातत्याने गुंतवणूक करत असतो. याच हेतूने आम्ही StopNCII.org आणि Women’s Safety Hub ही साधने विकसित केली आहेत तसेच हा सेफ्टी हब स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिला आहे, जसे की ही सुविधा मराठीमधून उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रभरातील महिलांना तिचा लाभ घेता येणार आहे.”
इन्स्टाग्रामचे ‘शी चॅम्पियन्स हर'
या मोहिमेतील दुसरा उपक्रम आहे इन्स्टाग्रामचा 'शी चॅम्पियन्स हर' जो Yuvaaया युथ मीडिया अँड इनसाइट कंपनीच्या सहयोगाने सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये गुंडगिरीविरोधात उभे राहणे, बॉडी पॉझिटिव्हीटी अर्थात सर्व प्रकारच्या बाह्यरूपाचा सकारात्मकतेने स्वीकार आणि उद्योजकता यांसारख्या विषयांच्या बाबतीत मतपरिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत ठरणा-या महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाणार आहे. @weareyuvaa वर महिनाभर चालणा-या कन्टेन्ट मालिकेद्वारे हा कौतुक सोहळा पार पडणार आहे. या मालिकेत आंतरराष्ट्रीय पॉप आर्टिस्ट आणि क्नेटन्ट क्रिएटर अवंती नागराल (Avanti Nagral,),स्त्री-हक्क आणि स्त्रीविषयक कायदे यांना वाहिलेला मंच Pink Legalच्या संस्थापक आणि सीईओ मानसी चौधरी, पालकत्व या विषयाला वाहिलेली कम्युनिटी Kidsstoppress च्या संस्थापक मानसी झवेरी आणि आरा हेल्थ (Aara Health)च्या सह-संस्थापक व Project Naveli च्या संस्थापक नव्यानवेली नंदा यांचा समावेश असणार आहे.
'शी चॅम्पियन्स हर'ची ही चळवळ दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता या पाच शहरांमध्ये होणा-या ओपन-माइक कार्यक्रमांच्या माध्यमातून आणखी पुढे नेली जाणार आहे. हे ओपन माइक कार्यक्रम म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही ठिकाणी अशाचप्रकारच्या कम्युनिटीज आणि अवकाश निर्माण करण्यावर भर देताना आपला प्रवास आणि उर्मींविषयी मुक्तपणे बोलण्यासाठीच्या सुरक्षित जागा असणार आहेत. या कार्यक्रमांचे तपशील जाणून घेण्यासाठी #SheChampionsHerफॉलो करा.
नताशा जोग, हेड, पब्लिक पॉलिसी, इन्‍स्‍टाग्राम, फेसबुक इंडिया (मेटा) म्हणाल्या, "आपला समाज स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर करतो. एका सुरक्षित आणि आपुलकीच्या वातावरणातच हे शक्य होऊ शकते. नवीन सेवांच्या हस्तक्षेपाच्या माध्यमातून तसेच #SheChampionsHerसारख्या मोहिमांतून आम्ही हे वातावरण निर्माण होण्यास मदत करत आहोत. या मोहिमेमधून आम्ही गुंडगिरी, बॉडी पॉझिटिव्हिटी आणि अगदी उद्योजकतेवरही होणा-या चर्चांचे नेतृत्व करणा-या महिलांचे कौतुक साजरे करणार आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनीही #SheChampionsHerवर आपल्या कहाण्या मांडून या मोहिमेत सहभागी व्हावे यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करत आहोत."
गेल्या वर्षामध्ये मेटाने फेसबुक आणि इन्स्टाग्रॅम अॅपवर हिडन वर्डस्, लिमिट्स, कमेन्ट्स कंट्रोल, मल्टी-ब्लॉक आणि हाइड लाइक्ससारखा पर्याय असे अशी अनेक सुरक्षा साधने सुरू केली आहे.
मेटा प्लॅटफॉर्म्स इंक. विषयी
लोकांना एकमेकांशी कनेक्ट होता यावे, समविचारी समुदाय शोधता यावेत व आपल्या व्यवसायाचा विस्तार करता यावा यासाठी त्यांची मदत करणा-या तंत्रज्ञानांचा विकास मेटाकडून केला जातो. मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्सनी जगभरातील कोट्यवधी लोकांना सक्षम केले आहे. आता मेटा द्विमीत पडद्यालाही पार करत ऑगमेंटेड व व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या सर्वार्थाने व्यापून टाकणा-या अनुभवाच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्यातून सामाजिक तंत्रज्ञानातील नव्या बदलांच्या उभारणीस मदत होणार आहे.