कोरोना वाढतोय, जपा स्वतःला! रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा काढा गुणकारी

12 Jun 2022 16:21:18

tea
(Image Source : Internet)
 
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व्यक्तीच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन काळापासून तुळशीचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. तुळशीमध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. त्याच्या सेवनाने बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. तुळशीचा काढा केवळ सर्दी आणि खोकलाच दूर करत नाही, तर व्यक्तीच्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील मजबूत करतो. चला तर मग जाणून घेऊया तुळशीचा काढा बनवण्याची सोपी पद्धत...
 
तुळशीचा काढा बनवण्याचे साहित्य:
 
१. १०-१२ तुळशीची पाने
२. अर्धे लेमनग्रास (हिरव्या चहाचे पान)
३. १ इंच किसलेले आल
४. ४ कप पाणी
५. गूळ 3 चमचे
 
कृती :
 
१. सर्व प्रथम तुळशीची पाने आणि लेमनग्रास चांगले धुवून घ्या.
२. एका पातेल्यात पाणी घालून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवा.
३. पाणी थोडे गरम झाल्यावर त्यात तुळशीची पाने, लेमनग्रास आणि किसलेल आलं घालून ४-५ मिनिटे उकळा.
४. यानंतर त्यात गूळ टाकून गॅस बंद करा.
५. चमच्याने काढा ढवळत राहा, जेणेकरून गूळ विरघळेल.
६. १-२ मिनिटांनंतर एका कपमध्ये गाळून घ्या आणि चहासारखे थोडे-थोडे प्या.
७. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुळशीच्या काढ्यामध्ये २-३ काळी मिरी देखील टाकू शकता.
८. तसेच अधिक चव हवी असल्यास एक वेलची ठेचून घाला.
९. लेमनग्रास मिळाला नसल्यास हरकत नाही. त्याशिवाय देखील तुम्ही तुळशीचा काढा बनवू शकता.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.
Powered By Sangraha 9.0