Mobile recharge;आता प्री-पेड धारकांना मिळणार २८ ऐवजी ३० दिवसांची व्हॅलिडिटी, कसं ते जाऊन घ्या!..

    11-Jun-2022
Total Views |
नवी दिल्ली:
Mobile recharge; देशातील मोबाईल ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी आणि जुन्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया (Telecom companies) यांनी विविध पॅकेज आणले आहेत. पण असं करताना त्यांनी आपल्या पॅकेजची व्हॅलिडिटी (Validity packages) कमी केल्याचे दिसून येते. त्यामुळे मोबाईल ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. सेवांच्या नावाखाली लूट करणाऱ्या दूरसंचार कंपनींना (Telecom companies)भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने चांगलाच(instructions given by TRAI) दणका दिला आहे.

14Image Source: Internet
देशात टाळेबंदीनंतर बहुतांश सर्वच व्यवहार डिजिट स्वरूपाचे झाले आहेत. वर्क फॉर्म होम पासून ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासापर्यंत सर्वच गोष्टी मोबाईलवरून होत असल्याने इंटरनेट आणि रिचार्ज पॅकेज घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. लोक मोबाईल रिचार्जवर अधिक पैसे खर्च करायला लागले आहेत. याचाच फायदा घेत दूरसंचार कंपन्यांनी आपल्या विविध रिचार्ज पॅकेजच्या किंमती वाढविल्या आहेत.
देशातील मोबाईल ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी आणि जुन्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया यांनी विविध पॅकेज आणले आहेत. पण असं करताना त्यांनी आपल्या पॅकेजची व्हॅलिडिटी कमी केल्याचे दिसून येते. त्यामुळे मोबाईल ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. सेवांच्या नावाखाली लूट करणाऱ्या दूरसंचार कंपनींना भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने चांगलाच दणका दिला आहे. त्यानुसार आता दूरसंचार कंपन्यांना २८ दिवसांच्या व्हॅलिडिटी (वैधता) ऐवजी ३० दिवसांची व्हॅलिडिटी द्यावी लागणार आहे.

14
भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने नुकतीच एका अधिसूचना काढली आहे. ज्यानुसार 'प्रत्येक दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीला किमान एक प्लॅन व्हाउचर, एक विशेष टेरिफ व्हाउचर आणि ३० दिवसांच्या वैधतेस कॉम्बो व्हाउचर देईल. दूरसंचार कंपन्यांना अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.

14
देशातील दूरसंचार कंपन्या ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह विविध रिचार्ज ऑफर देतात. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात तेरा रिचार्ज करावे लागतात. याचाच अर्थ की, १२ महिन्याच्या एका वर्षात एक रिचार्ज शिक्कल केला जातो. आता ३० दिवसांच्या रिचार्ज वैधतेमुळे ग्राहकांना फायदा होईल असं बोलल्या जात आहे.
Image Source:tari/internet