मिनिटा-मिनिटाला बदलणारा अनोखा पासवर्ड; ज्या बद्दल सहसा कुणाला ठाऊक नाही जाऊन घ्या!

    11-Jun-2022
Total Views |
नवी दिल्ली:
सद्याचे युग हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. एका बटनावर आपली संपूर्ण माहिती सर्वत्र पसरू शकते. सद्या मेसेज बॉक्सपासून ते आपल्या बँके खात्यापर्यंत सर्व काही मोबाईल, ई-मेल वर उपलब्ध असल्यामुळे आपण त्याला सुरक्षित करण्यासाठी काही विशेष संकेत शब्दांचा वापर करतो त्याला इंग्रजीत पासवर्ड असे म्हटल्या जाते.

18
Image Source: Internet
सद्याचे युग हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. एका बटनावर आपली संपूर्ण माहिती सर्वत्र पसरू शकते. सद्या मेसेज बॉक्सपासून ते आपल्या बँके खात्यापर्यंत सर्व काही मोबाईल, ई-मेल वर उपलब्ध असल्यामुळे आपण त्याला सुरक्षित करण्यासाठी काही विशेष संकेत शब्दांचा वापर करतो त्याला इंग्रजीत पासवर्ड असे म्हटल्या जाते. पासवर्ड चा उपयोग हा युजरची ओळख सत्यापित करण्यासाठी केला जातो. आज आपण अशा एका पासवर्ड बद्दल जाणून घेणार आहोत. जो प्रत्येक मिनिटाला बदलतो.
 

18
Image Source: Internet
 
 आज बऱ्याच प्रमाणात लोक पासवर्ड वापरतात, लोक सहसा सहज लक्षात राहणारे पासवर्ड ठेवतात. पण, जर पासवर्ड विसरलेतर मग सुरू होते ती डोकेदुखी , आता आपण अशा एका पासवर्ड बद्दल जाणून घेणार आहोत जो मिनिटाला बदलतो आणि सहजपणे युजरच्या लक्षातही राहतो. प्रत्येक मिनिटाला बदलणाऱ्या पासवर्डला टाईम पासवर्ड असं म्हटल्या जाते. टाईम पासवर्ड हा करंट टाईमच्या हिशेबाने चालतो, जस जस घड्याळीत वेळ बदलतो तसेच हा पासवर्ड ही बदलत असतो, घड्याळीत जी वेळ होते तोच हा टाईम पासवर्ड असतो, ज्यामुळे जर कुणी आपला पासवर्ड बघितला असेल तरी त्याला तो वापरता येणार नाही.
उदाहरण घ्याचे असेल तर समजा घड्याळीत १२ वाजून १० मिनिटे झाली असेल तर त्यावेळचा पासवर्ड असेल १२१०, पण प्रत्येक मिनिटाला हा पासवर्ड बदलत असल्यामुळे १२ वाजून ११ मिनिटे झाल्यावर पासवर्ड १२११ होईल.

या अनोख्या पासवर्ड चा वापर कसा करावा?
कदाचित हे पासवर्ड वावरण्याचे तंत्र सध्या कोणत्याही फोन मध्ये उपलब्ध नसेल, याचा वापर करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला गूगल प्लेस्टोर वरून एक अप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. टाईम पासवर्ड संदर्भात गूगल प्लेस्टोरवर अनेक अप्लिकेशन उपलब्ध आहे, ज्याचा वापर आपण करू शकतो. या पासवर्डचा वापर करणाऱ्याकडून विविध प्रतिक्रिया पुढे येत आहे.
पासवर्डचे प्रकार
प्रत्येक जण आपल्या मोबाईलला किंवा कोणत्याही डिजिटल उपकरणाला पासवर्ड ठेवतात त्यामध्ये सुद्धा प्रकार असतात ते म्हणजे सिंपल पासवर्ड, कॉम्प्लेक्स पासवर्ड आणि पॅटर्न किंवा कोड या प्रकारचे असतात.
(माहिती आणि फोटो इंटरनेट साभार)