Hansika Motwani Wedding : नवविवाहित हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नसोहळ्याची एक झलक

    05-Dec-2022
Total Views |

glimps of hansika and sohail wedding (Image Source : Instagram/ihansika_my_jaan)
मुंबई :
 
बॉलिवूडमध्ये लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेले अभिनेता अली फझल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा नुकतेच ऑक्टोबर महिन्यात लग्नबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आले असून अखेर ते ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. यानंतर आता 'शाका लाका बूम बूम' आणि 'कोई मिल गया' मध्ये बाल कलाकार म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी देखील लग्नबंधनात अडकली आहे.
 
glimps of hansika and sohail wedding
(Image Source : Instagram/ihansika_my_jaan)
 
अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने तिच्या स्वप्नातील राजकुमार उद्योजक सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधून आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात केली आहे.
 
glimps of hansika and sohail wedding
(Image Source : Instagram/ihansika_my_jaan)
 
हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांचा रविवार ४ डिसेंबर रोजी विवाहसोहळा पार पडला. विधिवत मंत्रोच्चारांसह हे दोघे लग्नाच्या बेडीत बांधले गेले असून त्यांच्या नात्याला नवविवाहित जोडप्याचा टॅग मिळाला आहे.

glimps of hansika and sohail's wedding
(Image Source : Instagram/ihansika_my_jaan)
 
हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत जयपूर नजीक असलेले मुंडोता किल्ल्यात या जोडप्याचा विवाहसोहळा पार पडला.
 
glimps of hansika and sohail wedding
 (Image Source : Instagram/ihansika_my_jaan)
 
यावेळी हंसिका आपल्या ब्रायडल लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत असून तिला आपल्या पत्नीच्या रूपात पाहून सोहेल देखील अतिशय आनंदी असल्याचे दिसून येत आहे.
 
glimps of hansika and sohail's wedding 
(Image Source : Instagram/ihansika_my_jaan)
 
 अभिनेत्री हंसिकाच्या हातातील चुडा आणि कलिरे तिच्या सुंदर ब्रायडल लूकमध्ये अधिकच भर घालत आहे.
 
 
 
 हंसिकाची ब्रायडल एंट्री जणू एखाद्या महाराणीच्या एंट्री प्रमाणेच झाली.
 

 
 
 हंसिका आणि सोहेल यांनी बराच काळ एकमेकांना डेट केले असून आता ते ऑफिशियली मॅरीड कपल झाले आहेत.
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.