नागपूर पोलिसात ४२९ पदांची पद भरती: असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड

    31-Dec-2022
Total Views |

mapose
image source internet
 
 
नागपूर :
 
नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी पोलिस प्रेमींसाठी नागपूर पोलिस आयुक्तालय एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयाने नागपूरच्या आस्थापनेवरील पोलिस भरती-२०२१ मधील ४२९ रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये पोलिस शिपाई चालक यासाठी एकूण १२१ तर पोलिस शिपायांसाठी एकूण ३०८ पदे रिक्त आहेत.
येत्या ४ जानेवारी २०२३ ते ११ जानेवारी २०२३ पर्यंत पोलिस शिपाई चालक भरतीसाठी लागणारे शारीरिक मोजमाप व मैदानी प्रक्रिया पोलिस मुख्यालय, टाकळी, काटोल नाका, नागपूर येथे होणार असून, पोलिस शिपाई भरतीसाठी होणाऱ्या शारिरीक मोजमाप व मैदानी चाचण्या १२ जानेवारी २०२३ पासून पोलिस मुख्यालय टाकळी, काटोल नाका, नागपूर येथे होणार आहेत. तरीही इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन, चाचणीसाठी प्रवेशपत्र  डाऊनलोड करून घ्यावे असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. 
 
संकेतस्थळ :http://policerecruitment2022.mahait.org