BTS boyband member बद्दल जाणून घ्या काही रंजक तत्थ्य

    30-Dec-2022
Total Views |

Kim Taehyung Birthday  (Image Source : Instagram/bts.bighitofficial)
 
सिओल: 
दक्षिण कोरियातील BTS हे एक जगप्रसिद्ध K-pop बॉय बँड आहे. बिगहिट एंटरटेनमेंटच्या या बुलेटप्रूफ बॉय स्कॉट ने आपल्या गाण्यांच्या मदतीने संपूर्ण जगभरतात नाव कमावले आहे. BTS ने बिलबोर्ड ते व्हाईट हाऊस प्रत्येक ठिकाणी आपल्या अनोख्या कामगिरीने एक विशेष छाप सोडली आहे. संपूर्ण जगभरात या बॉय स्कॉटचे करोडो चाहते आहेत. ३० डिसेंबर हा दिवस BTS ARMY साठी विशेष आहे. याचे कारण V या स्टेज नावाने ओळखल्या जाणाऱ्या Kim Taehyung चे आज वाढदिवस आहे. Tae Tae, Winter Bear आणि Gucci Boy अशा अनेक मोहक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या Kim Taehyung बद्दल या काही काही रंजक तथ्य तुम्हाला माहित आहेत का?
  
Kim Taehyung Birthday  
(Image Source : Instagram/bts.bighitofficial)
 
V या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या  Kim Taehyung चा जन्म ३० डिसेंबर १९५५ रोजी दक्षिण कोरियाच्या डेगू येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता.
 
Kim Taehyung Birthday
(Image Source : Instagram/bts.bighitofficial) 
 
BTS च्या सर्वोत्कृष्ट व्हिजुअल V हा खरतर आपल्या एका मित्राला पाठिंबा देण्यासाठी बिगहिटच्या ऑडिशनला गेला होता. परंतु त्याच्या मित्र ऐवजी त्याची निवड झाली. 
 
Kim Taehyung Birthday
  (Image Source : Instagram/thv)
 
बिगहिट एंटरटेनमेंट अंतर्गत BTS बॉय बँडच्या सदस्यांच्या रूपात V ने २०१३ मध्ये K-Pop जगात पदार्पण केले.
 
Kim Taehyung Birthday  
(Image Source : Instagram/thvl)
 
Kim Taehyung ने २०१६ मधील कोरियन पिरियड ड्रामा Hwarang मध्ये पहिल्यांदा अभिनय करून त्याच्या चाहत्यांच्या मनावर आपल्या अनोख्या अभिनयाची छाप सोडली आहे. 
 
Kim Taehyung Birthday  
(Image Source : Instagram/thv)
 
जगातील 'टॉप १० मोस्ट हँडसम मॅन २०२२' च्या यादीत देखील Kim Taehyung नी आपली जागा बनवली.

kim taehyung birthday special  
(Image Source : Instagram/bts.bighitofficial)
 
इंस्टाग्रामवर  BTS बॅन्डमेट्सने प्रथमच त्यांची वैयक्तिक खाती उघडल्यानंतर केवळ ४३ मिनिटांत १ दशलक्ष फॉलोवर्स मिळविण्यासाठी, तर अवघ्या ४ तास ५२ मिनिटांत १० दशलक्ष फॉलोवर्स मिळविण्यासाठी आतापर्यंतची वेगवान व्यक्ती म्हणून V ने २ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नवी केले आहे.
  
kim taehyung birthday special
 (Image Source : Instagram/bts.bighitofficial)
 
Taehyung हा गायक आणि अभिनेता असल्या बरोबरच एक मॉडेल देखील आहे. इतकेच नव्हे तर, 'The Most Expensive Brand Ambassador In The World' चा टायटल देखील Kim Taehyung ने आपल्या नवी केला आहे.
 
kim taehyung birthday special
(Image Source : Instagram/bts.bighitofficial)  
 
यावर्षी Kim Taehyung ची आंतरराष्ट्रीय वय यावर्षी २७ वर्षे झाली असली तरी कोरियन नियमांनुसार त्याचे वय एक वर्ष मोठे म्हणजेच २८ वर्षे झाली आहे. 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.