shraddha murder case: पोलिसांना मिळाला आफताब-श्रद्धाच्या भांडणाचा ऑडिओ

    26-Dec-2022
Total Views |

shraddha murder case audio clip leak
(Image Source : Internet/ Representative image)
 
नवी दिल्ली:
श्राद्धाच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सतत नवनवीन खुलासे होत आहेत. या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पुन्हा एक मोठा यश मिळवले आहे. पोलिसांना आफताब आणि श्राद्धाच्या भांडणाचा एक ऑडिओ मिळाला आहे. या ऑडिओमध्ये आफताब आणि श्रद्धा यांच्यात जोरदार वाद सुरु असल्याचे कळून येत आहे. इतकेच नव्हे तर, आफताब श्रद्धावर अत्याचार करत असल्याचे देखील ऑडिओ ऐकल्यावर समजून येत आहे.
 
आफताबला सध्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या दृष्टीने हा ऑडिओ अतिशय महत्वाचा पुरावा आहे. प्रकरणाच्या तपासात सहभागी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑडिओमुळे हत्येचा खरा हेतू शोधण्यात मदत मिळू शकते. या ऑडिओमधील आवाज ही आफताबची आहे की नाही हे तपासण्यासाठी CBI च्या CFSL टीम त्याच्या आवाजाचा नमुना घेईल. सोमवारी सकाळी CBI च्या CFSL टीमने तिहार तुरुंगातून त्याच्या आवाजाचा नमुना घेतला. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को चाचणी झाली आहे. यापूर्वी आफताबला पॉलिग्राफ चाचणीला देखील सामोरे जावे लागले होते.
 
श्रद्धा आणि आफताब लिव्ह-इनमध्ये राहत होते. दरम्यान आफताबने श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि दिल्लीतील वेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आफताबने पोलिसांना सांगितले होते की, १८ मे रोजी त्याचे श्रद्धासोबत भांडण झाले होते. भांडणानंतर त्याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आफताब हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवायचा आणि रोज रात्री मेहरौलीच्या जंगलात जाऊन श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा टाकायचा. श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. कोणाला तिच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून तो श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट वापरत राहिला. आफताबने श्रद्धाच्या खात्यातून ५४ हजार रुपयेही ट्रान्सफर केले होते. पोलिसांनी श्रद्धाचे मोबाइल लोकेशन आणि बँक खात्याच्या तपशीलाच्या मदतीने आफताबचा शोध घेतला आणि १२ नोव्हेंबरला त्याला अटक करण्यात आली.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.