लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला बल्लारशाह येथून अटक

    26-Dec-2022
Total Views |
 
child trafficking gang arrested from ballarshah
(Image Source : Internet/ Representative image) 
 
बल्लारशाह:
लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला बल्लारशाह व नागपूरच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या विषेश पथकाने अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लहान मुलांच्या तस्करीची एक घटना समोर आली होती. त्याच आधारे ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे गाडी क्रमांक १२६५५ नवजीवन एक्स कोच/६ मध्ये, २५ डिसेंबर ला एक जोडपं एका नवजात बाळाला घेऊन प्रवास करीत असल्याची माहिती या चमूला प्राप्त झाली.बाळ हा केवळ २ महिन्याचा असून, वारंवार रडत असल्याची माहिती चंद्रपूर पोस्टला देण्यात आली.
 
माहिती मिळताच नागपूर च्या Crime Investigation Branch (CIB) गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक उपनिरीक्षक (ASI) मुकेश राठोड, चंद्रपूर पोस्टचे ह्युमन ट्रॅफिकिंग टीमचे सदस्य निरीक्षक एन. राय, उप निरीक्षक प्रवीण महाजन, संजय शर्मा, व आर. एल. सिंह यांनी चंद्रपूर स्थानकांवर चौकशी केली. परंतु, एस/६ कोच मध्ये जोडपे नसल्याने त्यांनी ट्रेन मध्ये चौकशी सुरु ठेवली. दरम्यान चौकशी करीत असतांना, कोच एस ३ मध्ये नवजात बाळासोबत प्रवास करीत असलेल्या जोडप्यांवर चमूला संशय आला. संशय असतांना जोडप्याला बल्लारशाह स्थानकावर उतरविण्यात आले. पोस्ट वर नेण्यात आले चौकशी केल्यावर बल्लारशाहचे सब इन्स्पेक्टर (SI) प्रवीण यांनी (GRP) व चाईल्ड लाईनशी संपर्क साधून बाळाला सोपविले. त्यानंतर चंद्रपूर चाईल्ड लाईनच्या पंचांसमोर चौकशी सुरू असताना जोडप्याने अहमदाबाद वरून विजयवाडा पर्यंत बाळाला घेऊन जाण्याची गोष्ट स्वीकारली. त्यासाठी पुरुषाला १०,००० व महिलेला ५००० रुपये देण्यात आले होते. ते दोघे पती पत्नी नसून, लहान मुलांची तस्करी करण्याचा गुन्हा त्यांनी पोलिसांसमोर स्वीकारला.
 
ही संपूर्ण बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी आरोपी पुरुषाचा मोबाइल तपासाला त्यामध्ये विजयवाडा येथील, अन्य २ - ३ अनोळखी लोकांसोबत मुलांबाबत चॅट्स, व्हिडिओ , आणि देवाणघेवाणीच्या गोष्टी पोलिसांच्या समोर आली.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.