ग्रामायण सेवा प्रदर्शनात लाकडी शोभेच्‍या वस्‍तूंचे प्रमुख आकर्षण

24 Dec 2022 13:25:54
wooden handicrafts became main attraction at gramayana seva exhibition
नागपूर:
 
ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रामनगर मैदानात सुरू असलेल्या ग्रामायण सेवा प्रदर्शनाला बघण्‍यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहेत.
 
 
gramayana seva exhibition
 
शोभेच्‍या वस्‍तू, वस्‍त्र, विविध प्रकारची झाडे, अलंकार, मिलेट धान्‍य, मातीची भांडी आदी स्‍टॉल्‍स लोकांना आकर्षित करीत आहेत.
 
 
wooden handicrafts became main attraction at gramayana seva exhibition
 
निरुपयोगी, टाकाऊ लाकडातून आकर्षक आकाराच्‍या शोभेच्‍या वस्‍तू तयार करणारे भंडा-याचे महादेव साटोणे यांच्‍या हाताची कलाकुसर प्रदर्शनात बघण्‍यासारखी आहे. त्‍यांनी कच-यात फेकून देण्‍यासारख्‍या वस्‍तूंची अतिशय सुंदर कलाकृती तयार केल्‍या आहेत. बांबू आणि बारामसी गवतापासून तयार केलेल्‍या शोभेच्‍या वस्‍तूदेखील बघ्‍यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
 
 
gram seva exibitions second day
 
लेंटाना-बांबू क्राफ्ट डिंगडोरीच्‍या स्‍टॉलवर मध्‍यप्रदेशच्‍या डिंगडोरी गावातून आलेल्‍या बळवंत रहांगडाले यांनी या लेंटाना किंवा बारामसी गवतापासून वस्‍तू तयार केल्‍या आहेत. 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0