भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट निःशुल्क सहल: या आहेत तारखा

01 Dec 2022 12:30:59
 
tour circuit
(Image Source : Internet)
 
नागपूर :
पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांचे मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर येथे टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. या सर्कीटमध्ये नागपूर विभागातील दीक्षाभूमी, शांतीवन चिचोली, ड्रॅगन पॅलेस, नागलोक इस्टिटयूट ऑफ बुध्दीझम या स्थळांचा समावेश आहे.
 
२६ नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कीट टूरचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. स्थळांची प्रसिध्दी व प्रचालन करण्याकरीता ३, ४ व ७, ८ डिसेंबर या कालावधीत एक दिवसीय निःशुल्क सहल आयोजित करण्यात येणार आहे. तसेच या सहलीमध्ये पर्यटन विभागाद्वारे टूर गाईड, अल्पोपहार, बिसलरी पाणी, प्रथमोपचार कीट इत्यादींची सुविधा राहणार आहे.
 
सहलीचे आरक्षण ऑफलाईन पध्दतीने पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, वेस्ट हायकोर्ट रोड, ग्रामीण तहसील कार्यालय जवळ, सिव्हील लाईन्स येथे साधून नोंदणी करायची आहे.
 
सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन प्रशांत सवाई, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय यांनी केले आहे. या सहलीकरीता प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
Powered By Sangraha 9.0