५५३ व्या गुरू नानक जयंती सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी

    08-Nov-2022
Total Views |

pm narendra modi
 
शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु मानल्या जाणाऱ्या गुरू नानक देव यांची ५५३ वी जयंती आज संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरी होत आहे.

pm modi participates in guru nanak jayanti
 
दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरू नानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवाला 'गुरू परब' किंवा प्रकाश पर्व असे म्हणतात. शीख बांधवांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही.
 
pm modi participates in guru nanak jayanti
 
यानिमित सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रभातफेरी काढली जाते. शीख बांधव गुरुद्वारांमध्ये आपली सेवा देतात ठिकठिकाणी लंगचे आयोजन केले जाते.

pm modi participates in guru nanak jayanti 
 
गुरू नानक देव यांना बाबा नानक, नानक शाह अशा नावाने देखील संबोधिल्या जाते. पुरातन कथेनुसार, १५२६ मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भोई की तलवंडी येथे गुरू नानक देव यांचा जन्म झाला होता. आज त्यांच्या ५५३ व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरू नानक देव यांच्या जयंती सोहळ्यात भाग घेतला.

pm modi participates in guru nanak jayanti 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला गुरू नानक देव जी यांच्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

pm modi participates in guru nanak jayanti 
 
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, 'गुरू नानक देव यांच्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा. न्याय्य आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माणाच्या आपल्या प्रयत्नामधे त्यांची उदात्त शिकवण मार्गदर्शन करत राहो.'