गुरुनानक जयंती : प्रकाशाचा पावन पर्व

    08-Nov-2022
Total Views |

guru nanak jayanti
 (Image Source : Internet)
 
संपूर्ण देशात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरू नानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवाला 'गुरू परब' किंवा प्रकाश पर्व असे म्हणतात. शीख बांधवांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. यानिमित सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रभातफेरी काढली जाते. शीख बांधव गुरुद्वारांमध्ये आपली सेवा देतात ठिकठिकाणी लंगचे आयोजन केले जाते.
गुरू नानक देव यांना शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू मानले जाते. गुरू नानक देव यांना बाबा नानक, नानक शाह अशा नावाने देखील संबोधिल्या जाते. लडाख आणि तिबेटच्या प्रदेशात त्यांना नानक लामा असे म्हणतात.
पुरातन कथेनुसार गुरू नानक देव यांचा जन्म १५२६ मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 'भोई की तलवंडी' येथे झाला, हा दिवस प्रकाशाचा म्हणजेच दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. गुरू नानक यांनी जीवनाशी संबंधित अनेक शिकवण दिल्या, त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे आणि दिलेल्या उपदेशांचे लोक आजही पालन करतात.

guru nanak jayanti 
 
गुरू नानक देव यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण सध्याच्या पाकिस्तान मध्ये आहे. या ठिकाणाला गुरू नानक देव यांचे नाव देण्यात आले आहे, 'नानकाना साहिब' येथे महाराजा रणजीत सिंह यांनी गुरुद्वारा तयार केला असल्याचे सांगितल्या जाते.
गुरू नानक यांनी भारतातच नव्हे तर अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांमध्ये प्रवचन देत शीख धर्माचा प्रचार प्रसार केला. गुरु नानक यांनी आपले आयुष्य मानव समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले.
 
Disclaimer : या लेखातील माहितीची आणि कथांच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ पौराणिक कथा/ शास्त्रानुसार एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे असून वाचकाने ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. अभिजीत भारत या लेखात लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीवर दावा करत नाहीत.