भेसळीच्या संशयावरून 74 लाख 95 हजारांचा साठा जप्त

08 Nov 2022 13:31:21

adulteration
image source internet
 
नागपूर
अन्न व औषध प्रशासनच्या वतीने १ नोव्हेंबर पासून अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीच्या संशयावरून 74 लाख 95 हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यात मसाले, सुपारी व चहा पावडरचा समावेश आहे.
वडधामना येथील मे. कामख्या इंटरप्राइजेस यांच्याकडून 11 हजार 161 किलो वजनाची 58 लाख 3 हजार 742 रुपयांची काळीमिरी, भरतवाडा येथील जयलालजी ट्रेडर्स 2 हजार 94 किलो वजनाची नऊ लाख, 59 हजार 300 रुपयांची सुपारी, शांतीनगर येथील आमिर गृह उद्योग 1 हजार 916 किलो वजनाची 7 लाख 30 हजार 500 रुपयांची सुपारी, मानेवाडा येथील मे. साईकृपा पान शॉप अँड कोल्ड ड्रिक्स,1.4 किलो वजनाचा 1 हजार 200 रुपयांचा खर्रा, मानेवाडा येथील मे. साईकृपा अमृतुल्य यांचेकडून 3 किलो वजनाची व 840 रुपयांची चहा पावडर असा एकूण 15 हजार 175 किलोंचा 74 लाख 95 हजार 582 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ प्रकरणी साठा जप्त करून हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये मे. साईकृपा पान शॉप अॅन्ड कोल्ड ड्रिंक्सच्या विक्रेत्याविरुद्ध भा.दं.वि.च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच विक्रेत्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
सर्व अन्न पदार्थ जप्त करून अन्न नमुने अन्न विश्लेषकाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई नागपूर विभागाचे सह आयुक्त सु. गं. अन्नपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0