भारतातीय लष्कराची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल या पाच मेक II ला मंजुरी

    06-Nov-2022
Total Views |

indian army
image spurce internet
 
नवी दिल्ली,
जागतिक समर्थ असणाऱ्या भारतीय लष्कराची सध्या आत्मनिर्भतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. देशात विकसित विशिष्ट तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यासाठीचा प्रमुख घटक म्हणून “मेक प्रोजेक्ट्सला” ला चालना देण्यासाठी भारतीय लष्कर आघाडीवर आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना आणखी चालना देण्यासाठी, भारतीय लष्कराने आता पाच मेक II प्रकल्पांच्या प्रकल्प मंजुरी आदेशांना (पीएसओ ) मान्यता दिली आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, मेक II प्रकल्प हे प्रामुख्याने उद्योगांकडून अर्थसहाय्यित प्रकल्प असून, या प्रकल्पांअंतर्गत उत्पादनाच्या विकासासाठी भारतीय विक्रेत्यांच्या माध्यमातून डिझाइन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपायांचा त्यात समावेश आहे. यशस्वी उत्पादन नमुन्याच्या विकासानंतर मागणी नोंदवण्याची हमी देण्यात आली आहे.
हाय फ्रिक्वेंसी मॅन पॅक्ड सॉफ्टवेअर डिझाईन रेडिओ (एचएफएसडीआर) -
मेक II योजनेअंतर्गत फ्रिक्वेंसी मॅन पॅक्ड सॉफ्टवेअर डिझाईन रेडिओच्या (एचएफएसडीआर) उत्पादन नमुना विकासासाठी प्रकल्प मंजुरी आदेश (पीएसओ) 14 विकसनशील संस्थांना (डीए) जारी करण्यात आला आहे. उत्पादन नमुन्याच्या यशस्वी विकासानंतर भारतीय लष्कराकडून 300 एचएफएसडीआर खरेदी करण्याचे नियोजन आहे. अत्याधुनिक, हलक्या वजनाचा एचएफएसडीआर वाढीव डेटा क्षमता आणि बँडविड्थसह वाढीव सुरक्षिततेद्वारे लांब पल्ल्यावरचे रेडिओ संप्रेषण प्रदान करेल.हे जीआयएस वापरून नकाशा आधारित दळणवळणासह ब्लू फोर्स ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध करून देईल यामुळे वास्तविक वेळेत परिस्थितीजन्य जागरूकता वाढेल.हे रेडिओ संच सूचीमधील मर्यादित डेटा हाताळण्याची क्षमता आणि जुने तंत्रज्ञान असलेल्या .विद्यमान एचएफ रेडिओ संचांची जागा घेतील.

ड्रोन नष्ट करणारी यंत्रणा -
ड्रोनशी संबंधित तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत असले तरीही आरपीएएस /एस ने आधुनिक युद्धभूमीवर मोठा प्रभाव पाडला आहे.या क्षेत्रात जागतिक दर्जाची उत्पादने विकसित करण्यासाठी स्वदेशी उद्योगाकडे पुरेसे नैपुण्य आहे.स्वदेशी ड्रोन-विरोधी यंत्रणेला आणखी प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून,उत्पादन नमुना यशस्वीरीत्या विकसित केल्यानंतर , मेक II योजनेंतर्गत ड्रोन नष्ट करणाऱ्या यंत्रणेच्या 35 संचांच्या खरेदीसाठी भारतीय लष्कराने 18 विकसनशील संस्थांना (डीए ) प्रकल्प मंजुरी आदेशांना (पीएसओ ) मान्यता दिली आहे. हा प्रकल्प एमएसएमई/स्टार्ट-अपसाठी राखीव आहे.
इन्फंट्री ट्रेनिंग वेपन सिम्युलेटर (आयडब्‍ल्यूटीएस) -
मेक II प्रक्रियेअंतर्गत आयडब्‍ल्यूटीएसच्या 125 संचांच्या पुढील खरेदीसाठी नमुना उत्पादन विकसित करण्यासाठी चार विकसनशील एजन्सींना (डीएंना) प्रकल्प मंजुरी आदेश (पीएसओ) जारी करण्यात आला आहे. आयडब्लूटीएस ही भारतीय लष्कराची प्रमुख सेवा म्हणून ‘मेक II ‘ प्रकल्पाची पहिली ‘ट्राय सर्व्हिस’ आहे. हा प्रकल्प एमएसएमई/स्टार्ट अपसाठी राखीव आहे. आयडब्लूटीएसचा वापर युवा सैनिकांचे विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांवर निशाणेबाजीचे कौशल्य वाढविण्यासाठी केला जाईल. त्यांना वापरणे सोईचे व्‍हावे यासाठी ग्राफिक्स प्रदान करून युध्दातील परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी प्रत्येक आयडब्लूटीएस एकाच वेळी 10 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाईल.
155 मिमी टर्मिनली गाईडेड युद्धसामग्री (टीजीएम)-
‘मेक II’ योजनेअंतर्गत 155 मिमी टर्मिनली गाईडेड म्युनिशन (टीजीएम) च्या विकासासाठी सहा विकसनशील एजन्सींना (डीएंना) प्रकल्प मंजुरी आदेश जारी करण्यात आला आहे. हवाई दलामध्ये ‘अचूक हल्ला करण्‍याची’ क्षमतेच्या ‘इन्व्हेंटरी’मध्ये दारुगोळ्याचे प्रकार ठेवण्यात आले होते. 155एमएम टीजीएमच्या अंदाजे 2000 फेर्‍या करताना अतिमहत्वाच्या लक्ष्याविरुद्ध निश्चित अचूकता आणि मारकतेसह मोहीम पूर्ण करण्यासाठी आणि आपले कमीतकमी नुकसान व्‍हावे, अशी हवाई दलाची योजना आहे.

मध्यम पल्ल्याची अचूक मारा करणारी प्रणाली (एमआरपीकेएस)-
डीएपी 2020 च्या 'मेक -II’ श्रेणी अंतर्गत एमआरपीकेएसचे नमुना उत्पादन विकसित करण्यासाठी 15 विकसनशील एजन्सींना (डीएंना) प्रकल्प मंजुरी आदेश जारी करण्यात आला आहे. या प्रोटोटाइपच्या यशस्वी विकासानंतर, हवाई दल एमआरपीकेएसचे 10 संच खरेदी करेल. मध्यम पल्ल्याची अचूक मारा करणारी प्रणाली सिस्टम (एमआरपीकेएस), एकदा लाँच केल्यावर दोन तासांपर्यंत हवेत ‘स्थिर ’ राहू शकते आणि ४० किमीपर्यंतचे रिअल टाइम उच्च मूल्य लक्ष्य प्राप्त करू शकते, नियुक्त करू शकते आणि शत्रूला व्यग्र ठेवू शकते. येणार्‍या काळात आपण आपला देश ‘लोइटरिंग म्युनिशन टेक्नॉलॉजी’ मध्ये “आत्मनिर्भर” बनताना पाहणार आहोत.
भांडवल संपादनाच्या ‘मेक II’ प्रक्रियेअंतर्गत भारतीय सैन्य याआधीपासूनच सुरू असलेल्या 43 प्रकल्पांमध्ये प्रगती करत आहे. उद्योगाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांद्वारे 43 पैकी 17 प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. यामुळे भारतीय संरक्षण उद्योगात “मेक प्रक्रिया” मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून उत्‍साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.