खामल्यातील गुरुमंदिरात १० दिवसीय दत्तजयंती उत्‍सव सोहळा

    28-Nov-2022
Total Views |

Datta Jayanti festival
 (image source : internet) 
 
नागपूर :
शहरातील प. पू. समर्थ सद्गुरू श्री विष्‍णुदासस्‍वामी महाराज अध्‍यात्‍म-साधना केंद्राच्यावतीने १० दिवसीय श्री दत्त जयंती उत्‍सव सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे. जयप्रकाश नगर येथील आरबीआय कॉलनीतील श्री गुरुमंदिर येथे २९ नोव्‍हेंबर ते ८ डिसेंबर दरम्‍यान हा सोहळा पार पडणार आहे. या १० दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्‍कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
 
मंगळवार २९ नोव्‍हेंबर रेाजी सायंकाळी ७ वाजता प. पू. कै. आक्‍काई यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त भजन संध्‍या होणार असून श्री शिवपंचायतन मंदिर व दत्तदरबार भक्‍तगण भजन सादर करतील. बुधवार ३० नोव्‍हेंबर ते मंगळवार ६ डिसेंबर दरम्‍यान दररोज सकाळी १० ते १२.३० वाजेदरम्‍यान श्रीगुरुचरित्र पारायण सप्‍ताह होईल. तर सायंकाळी ७ ते ९ दरम्‍यान औरंगाबादचे हभप मनोहरबुवा दीक्ष‍ित यांचे कीर्तन होणार आहे. दररोज दुपारी ३.३० ते ५ वाजेदरम्‍यान संत सेवा संघ पुणेचे संस्थापक प्रवचनकार प. पू. संजय गोडबोले गुरुजी यांचे ‘पसायदान एक वैश्विक प्रार्थना’ विषयावर प्रवचन होणार आहे.
 
७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता पालखी सोहळा आयोजित करण्‍यात आला असून श्री गुरुमंदिरातून श्री दत्ताची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी काढली जाणार आहे. श्री दत्त मूर्तींना पंचसूक्‍त पवमान अभिषेक, रुद्राभिषेक होईल. त्‍यानंतर ११.३० वाजता श्री दत्तजन्‍म सोहळा होणार आहे. सायंकाळी ५.३० बालकीर्तनकार अमोघ अमर देशपांडे यांचे श्री दत्तजन्‍म कीर्तन होईल. त्‍यानंतर सायंकाळी ७ वाजता प.पू. सद्गुरूदास महाराजांचे समारोपीय अभंग निरुपण होणार आहे. गुरुवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हभप डॉ. रमेशपंत गोडबोले व सहका-यांचे काल्‍याचे कीर्तन होईल. दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाने उत्‍सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थि‍त राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.