मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी विभागाची पाहणी केली

    27-Nov-2022
Total Views |

gm central railway
 
नागपूर,
 
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नागपूर विभागातील इटारसी-बैतुल-आमला-परासिया विभागाची वार्षिक तपासणी केली. महाव्यवस्थापकांनी सहेली आणि काळा आखर स्थानकांदरम्यान असलेल्या सहेली पुलाची पाहणी करून सुरुवात केली आणि त्यानंतर काळा आखर- घोराडोंग्री विभागावर ताशी 130 किमी वेगाने धाव घेतली. घोराडोंग्री स्थानकावर, महाव्यवस्थापकांनी परिभ्रमण क्षेत्र, पॅनेल/रिले कक्ष, सोलर प्लांट, रेल्वे कॉलनी आणि उद्यानाची पाहणी केली. त्यांनी लेव्हल क्रॉसिंग गेटची पाहणी केली, धराखोह येथील कॅच साईडिंग तपासणी त्यानंतर बोगदा, व्हायाडक्टची पाहणी केली आणि धाराखोह-मरामझिरी विभागावरील ट्रॅक मेंटेनरच्या गँग युनिटशी संवाद साधला. मरामझिरी-बैतूल विभागावरील पुलाखालील रस्त्याचीही त्यांनी पाहणी केली.
 
बैतूल स्टेशनवर, लाहोटी यांनी व्यावसायिक, लेखा, वैद्यकीय, आरपीएफ आणि राजभाषा विभागांद्वारे प्रदर्शित केलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली. त्यांनी स्टेशनवरील प्रदक्षिणा क्षेत्र, पॅनेल रूम, बुकिंग ऑफिस कॉन्कोर्स आणि वेटिंग रूमची पाहणी केली. त्यानंतर गुड्स शेड, ट्रॅक मशीन साईडिंग, आरपीएफ कार्यालय आणि स्क्रॅप लॉटची तपासणी करण्यात आली. बैतूल स्टेशनवर  लाहोटी यांनी  दुर्गादास उईके, माननीय खासदार, बैतूल, ब्रह्मा भालवी, माननीय आमदार, घोराडोंग्री डॉ. योगेश पंडाग्रे, माननीय आमदार, सुनील उइके जुन्नारदेव,  सोहन वाल्मिक, माननीय आमदार परासिया आणि लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली आणि माध्यमांशी संवादही साधला.
महाव्यवस्थापकांनी आमला येथे अपघात निवारण ट्रेन आणि अपघात निवारण वैद्यकीय उपकरणांची पाहणी केली, त्यानंतर आमला-बोर्डाई सेक्शनवर धावण्याचा वेग आणि नवेगाव ते हिरडागड दरम्यान किमी 929/400 ते 930/600 आणि किमी 921/500 या वक्रची तपासणी केली. जुन्नारदेव स्थानकावर, महाव्यवस्थापकांनी परिभ्रमण क्षेत्र, पॅनेल कक्ष, प्रतीक्षा कक्ष आणि क्रू लॉबी, आरपीएफ कार्यालय आणि आरोग्य युनिटची पाहणी केली. नागपूर येथे श्री लाहोटी यांनी युनियन, विविध संघटना आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या पाहणीवेळी नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे, विभागाचे प्रमुख विभागप्रमुख आणि शाखा अधिकारी उपस्थित होते.