फुटाळा स्थित Musical fountain प्रकल्पाला Skoch Award Silver 2022

    25-Nov-2022
Total Views |

musical fountain project
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (NMRDA) ना.सु.प्र. निधीतून नागपूर शहरातील फुटाळा तलाव येथे आंतराष्ट्रीय दर्जाचे संगीत कारंजे व मल्टीमिडीया शो (Musical fountains and multimedia shows) प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नागपूर शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडलेली असून यामुळे पर्यटनामध्ये भविष्यात भर पडणार आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवर Skoch Award Silver 2022 जाहीर झाला आहे.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या प्रकल्पात संगीताची धून व रंगीतमय प्रकाशावर फुटाळा तलावात उभारलेले कारंजे उडतात. शिवाय याद्वारे अत्यंत प्रभाविपणे नागपूरचा इतिहास नाना पाटेकर यांच्या आवाजात मराठीमध्ये, गुलजार यांच्या आवाजात हिंदीमध्ये तर महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजात इंग्रजीमध्ये सुद्धा सांगण्यात येतो. यासाठी प्रकल्पाअंतर्गत वापरण्यात आलेले नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान व मांडणी लक्षात घेता सदर प्रकल्पाचे नामप्रविप्रा द्वारे Skoch Award 2022 करीता नामांकन करण्यात आले होते. Skoch समूहाद्वारे विविध चाचण्यांन्वये प्रकल्पाचे Evaluation करण्यात आले. आता प्रकल्पाची अंतिम फेरीकरीता निवड करण्यात आली असून अंतिमत: २३ नोव्हेंबर रोजी प्रकल्पाला Skoch Award Silver 2022 जाहीर करण्यात आला आहे. Award वितरणाचा कार्यक्रम १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे.
 
Skoch समूह हा १९४७ पासून कार्यरत असून सर्वसमावेशक वाढीव लक्ष केंद्रीत करून सामाजिक आर्थिक समस्या हाताळणारा भारतातील अग्रगण्य समूह आहे. सदर समूह सल्लागार सेवा, मीडिया, सार्वजनिक तथा व्यावसायिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. Skoch समूहाच्या ग्राहकांमध्ये प्रशासकीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र व ५०० पेक्षा अधिक व्यावसायिक क्षेत्रातील शिर्ष कॉर्पोरेशन्सचा समावेश आहे. या व्यतिरीक्त Skoch समूह आयटी, सुरक्षा, शहरी विकास व पायाभूत सोयीसुविधा इत्यादी क्षेत्रांमध्ये सुद्धा कार्यरत आहे. सदर प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण महानगर आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर आयुक्त, अविनाश काताडे व अधीक्षक अभियंता शप्रशांत भांडारकर यांनी केले.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.