परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचे फोटो वापरण्यास मनाई; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

    25-Nov-2022
Total Views |

Mahanayak Amitabh Bachchan
(Image Source : Internet)
 
नवी दिल्ली :
महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मिळालेला माहितीनुसार, अनेक कंपन्या अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव आणि फोटो वापरत आहेत. त्याच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय दिला.
 
अमिताभ बच्चन यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर सुप्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी अमिताभ बच्चन यांच्या वतीने न्यायमूर्ती नवीन चावला यांच्यासमोर युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने अमिताभ बच्चन यांच्या बाजूने निकाल दिला.
 
यात आता अमिताभ बच्चन यांच्या परवानगी शिवाय त्याचे फोटो, नाव आणि आवाज वापरता येणार नाही. इतकेच नाही तर, न्यायमूर्ती नवीन चावला यांनी प्राधिकरण आणि दूरसंचार विभागाला आदेश जारी केले की, बिग बींचे नाव, फोटो आणि व्यक्तिमत्त्वाचे स्टेटस तात्काळ काढून टाकावे, जे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर अमिताभ बच्चन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.