७५ रायडर्स, ७५ दिवस अन् ७५ शहर; फ्रीडम रायडर बाइकर रॅलीचा यशस्वी समारोप

25 Nov 2022 17:51:14

freedom rider biker rally
 (Image Source : PIB)
 
नवी दिल्ली :
फिट इंडिया फ्रीडम रायडर बाइकर रॅली अंतर्गत ११ महिलांसह एकूण ७५ रायडर्सचा प्रवास अखेर पूर्ण झाला आहे. या ७५ रायडर्सनी ७५ दिवसांमध्ये, कन्याकुमारी ते वाराणसी आणि गांधीनगर ते शिलॉन्ग अशा ३४ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधल्या ७५ शहरे/नगरांचा १८ हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. यातच पार्श्वभूमीवर गुरुवारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे फिट इंडिया फ्रीडम रायडर बाइकर रॅलीचा समारोप सोहळा संपन्न झाला.
 
ही अनोखी मोहीम ऑल इंडिया मोटरबाइक एक्सपिडिशन (AIME) द्वारे आयोजित करण्यात आली होती. जिल्हा केंद्र सरकारच्या फिट इंडिया या प्रमूख उपक्रम म्हणून समर्थन दिले होते. या समारोप समारंभाला केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव सुजाता चतुर्वेदी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदिप प्रधान, तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणातील इतर मान्यवर उपस्थित होते. 

freedom rider biker rally
 
या बाइक स्वारांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान, केवडियातील स्टॅच्यू ऑफ युनिटी, सिमला येथील व्हिसेरेगल लॉज, गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर, मदुराईमधील मीनाक्षी मंदिर इत्यादी प्रतिष्ठित ठिकाणांनाही भेट दिली. त्यांनी उत्तरेकडील पट्ट्यातील पठारे, पश्चिमेकडील वाळवंट, ईशान्येकडील पर्वत, दक्षिणेकडील किनारपट्टी मार्गे प्रवास केला आणि सियाचीन सारख्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना केला.
'या असामान्य कामगिरीबद्दल मी सर्व ७५ स्वारांचे अभिनंदन करते. मला आनंद आहे की तुम्ही सर्वजण सुखरूप परतलात आणि अनेकांना प्रेरणा दिली आहे,' असे सुजाता चतुर्वेदी यांनी नमूद केले. निरोगी आणि तंदुरुस्त राहणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने या राष्ट्रीय कर्तव्यासाठी काम करावे आणि तंदुरुस्त रहावे, अशी माझी इच्छा आहे, असेही त्या म्हणाल्या.
या रॅली दरम्यानच्या कार्यक्रमांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, मणिपूर आणि गुजरातचे राज्यपाल, स्थानिक खासदार, जिल्हाधिकारी तसेच प्रसिद्ध व्यक्तींसारख्या महत्त्वाच्या मान्यवरांनी भाग घेतला. या मोहिमे दरम्यान, बाइकरच्या तुकडीने या मोहिमेबद्दल माहिती दिली आणि त्यांचे अनुभव देखील कथन केले आणि त्यानंतर प्रेक्षकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी आरोग्याविषयी संवाद देखील साधला. या रायडर्सनी गुजरातमधील गरबा सारख्या विशेष कार्यक्रमांमध्ये देखील भाग घेतला के या मोहिमेतील मुख्य आकर्षणांपैकी एक ठरले.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0