IAS अधिकाऱ्यांच्या जीवनावर आधारित '12वी फेल'; विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत

    24-Nov-2022
Total Views |

vikrant massey to play lead in 12th fail
 
मुंबई :
नेहमीच सामान्य कथेपेक्षा जरा वेगळी कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येणारे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. असे म्हटले जाते की भारतातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात एक विद्यार्थी असतो, ज्याचे आयएएस (IAS) किंवा आयपीएस (IPS) अधिकारी बनण्याचे स्वप्न असते. अशाच विद्यार्थ्यांवर विधू विनोद चोप्रा यांचा आगामी चित्रपट आधारित आहे.
 
परिंदा, 1942: अ लव्ह स्टोरी, मिशन कश्मीर, मुन्नाभाई फ्रँचायझी, 3 इडियट्स आणि पीके यांसारखे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर, फिल्ममेकर विधू विनोद चोप्रा यांनी आपल्या आगामी '12वी फेल' चित्रपटाची घोषणा केली आहे. विधू हे चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करत आहेत. हा चित्रपट अनुराग पाठक यांच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या नॉव्हेलवरून रूपांतरित आहे.
 
'12वी फेल' हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या वास्तविक जीवनातील कथेवरून प्रेरित आहे. पण '12वी फेल' हे चरित्र नसून, पुरुष किंवा स्त्री प्रामाणिकपणे कसा बदल घडवू शकतात याचे एक सामर्थ्यचित्र आहे. '12वी फेल' हा पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण नवी दिल्लीतील मुखर्जी नगर येथे झाले आहे, जिथे ब्यूरोक्रेट्सच्या पिढ्या जन्मल्या आहेत.
 
चित्रपटाबद्दल बोलताना विधू विनोद चोप्रा म्हणाले, 'जर प्रामाणिक व्यक्ती सत्तेच्या पदावर असेल तर जग खरोखर बदलू शकते. हा चित्रपट लिहिण्याच्या प्रक्रियेत मी असंख्य आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसोबत आलो आहे. जर हा चित्रपट आणखी 10 अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणेसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करू शकतो, तसेच आणखी 10 विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी प्रेरणा देऊ शकतो. तर मला विश्वास आहे की मी यशस्वी झालो आहे.'
 
विक्रांत मेस्सी साकारणार मुख्य भूमिका
या चित्रपटात विक्रांत मेस्सी मुख्य भूमिका साकारणार आहे. याबाबत बोलताना विक्रांत म्हणाला, 'प्रामाणिकपणा दुर्मिळ झाली आहे आणि ही आपल्या काळची शोकांतिका आहे. हा चित्रपट स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, तसेच सर्व प्रामाणिक अधिकाऱ्यांना समर्पित आहे जे आपल्या देशाचा आणि संविधानाचा कणा आहेत. विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, एक मोठे आव्हान आहे कारण तो एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे.'
 
दरम्यान, व्हीव्हीसीने '12वी फेल'चे पहिले शेड्यूल चंबळमध्ये पूर्ण केले असून सध्या दिल्लीत दुसऱ्या शेड्यूलचे चित्रीकरण सुरू आहे. हा चित्रपट २०२३मध्ये उन्हाळ्यात प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.