विक्रम गोखलेंबाबतच्या 'त्या' केवळ अफवा; अजूनही उपचार सुरु

    24-Nov-2022
Total Views |

vikram gokhale
(Image Source : Internet)
 
मुंबई :
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या चित्रपट आणि मालिकांमधील अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. बुधवारी सायंकाळपासून त्याच्या प्रकृतीशी संबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले. मात्र, विक्रम गोखले यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या मृत्यूची ती केवळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. त्यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी देखील सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे सांगितले आहे.
 
अनुभवी अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांपासून त्यांची झुंज सुरू आहे. त्यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. डॉक्टर त्यांच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, असे राजेश दामले यांनी सांगितले आहे.
 
उपचारांना प्रतिसाद नाही : वृषाली गोखले
गेल्या २४ तासांपासून विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ते उपचारांना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देत नाही. त्यांचे अनेक अवयव निकामी आहेत, अशी माहिती विक्रम गोखले यांची पत्नी वृषाली गोखले यांनी दिली आहे.
 
अभिनेता लाईफ सपोर्टवर : रुग्णालयाची माहिती 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील पीआरओ गिरीश याडगीकर यांनी देखील याबाबत माहिती देताना सांगितले की, आज सकाळी १० वाजता विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांची आणि डॉक्टरांची बैठक झाली. अभिनेता गोखले जिवंत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
 
 
दरम्यान, विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ५ नोव्हेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मध्यंतरी उपचारामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारही दिसून आला होता.  मात्र, नंतर त्यांची तब्येत पुन्हा खालावली.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.