ओडिशातील केंद्रपाडात फटाक्यांमुळे स्फोट; ३० हून अधिक जखमी

    24-Nov-2022
Total Views |

blast in kendrapara
(Image Source : Internet/ Representative image)
 
भुवनेश्वर :
देशात दररोज काहीनाकाही घटना घडत असतात. ओडिशातील केंद्रपाडा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे जवळपास ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालिया बाजार येथे एका विसर्जन मिरवणुकीत स्पर्धा सुरु असताना बुधवारी ही घटना घडली. या घटनेत ३० लोकांपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना केंद्रपाडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे केंद्रपाडाचे जिल्हा दंडाधिकारी अमृत ऋतुराजा यांनी सांगितले आहे.
 
जाजपूर जिल्ह्यातही घडली आगीची घटना
दरम्यान, येथील जाजापूर जिल्ह्यात देखील बुधवारी अशीच एक घटना घडली होती. जाजापूर जिल्ह्यातील धनेश्वर परिसरात असलेल्या एका भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच पथक आणि ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.