Health Update : कमल हसन यांना लवकरच रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज

    24-Nov-2022
Total Views |

South Superstar kamal hassan (Image Source : Internet)
 
मुंबई :
साऊथ सुपरस्टार आणि मक्कल निधी मैमचे प्रमुख कमल हसन यांची बुधवारी रात्री अचानक ताब्यात खालावली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे. कमल हसन यांनी तापाची तक्रार केल्यानंतर त्यांना उपचारासाठी चेन्नईच्या श्री रामचंद्र रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांनी तपासणी केली असून त्यांना काही दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. आता त्यांच्या प्रकृतीबाबत आणखी एक नवे अपडेट समोर आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कमल हसन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे त्यांना येत्या एक ते दोन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असे श्री रामचंद्र रुग्णालयाने सांगितले आहे. बुधवारी त्यांना सौम्य ताप, खोकला आणि सर्दीच्या तक्रारीसह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
दरम्यान, बुधवारी हैदराबादहून शूटिंग पूर्ण करून कमल हसन चेन्नईला परतत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यांना प्रथम अस्वस्थ वाटू लागल्यानंतर हलका ताप जाणवला. त्यामुळे उशीर न करता त्यांना हैदराबादहून परतल्यानंतर लगेचच चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कमल हसन यांना गुरुवारी सकाळी डिस्चार्ज मिळाल्याचा दावाही केला जात होता. मात्र, रुग्णालयाने याबाबत माहिती देत त्यांना येत्या एक-दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल, असे स्पष्ट सांगितले आहे. असे असले तरी कमल हसन किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.