Winter Care : स्वस्थ आरोग्यासाठी दररोज खा आवळ्याचा मुरब्बा

    23-Nov-2022
Total Views |

amla murabba
(Image Source : Internet)
 
नागपूर :
हिवाळा सुरु झाला की लगेच संबंधित आजारचा त्रासही होण्यास सुरुवात होते. हिवाळ्यात सर्दी-खोकल्याची समस्या तर सामान्यच होऊन जाते. म्हणून थंडीच्या वातावरणात आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळ्यात नेहमी गरम कपडे घालून राहणे, पौष्टिक आहार घेणे हे अत्यावश्यक असते. तसेच अधिक प्रमाणात फळे आणि भाज्या खाल्ल्याने देखील हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात बाजारात अनेक हंगामी फळे सहज उपलब्ध असतात. आवळा देखील भरपूर प्रमाणात दिसतो. आयुर्वेदानुसार, असे म्हटले जाते की आवळ्यामध्ये बरेच औषधी गुण आहेत, जे आपल्या आरोग्याला सुदृढ बनवून रोगप्रतिकारशक्ती वाढवते. परंतु याच्या आंबट आणि तुरट चवीमुळे बरेच लोक हे खाणे टाळतात. आज आपण याच आवळ्यापासून एक खास पदार्थ बनवणार आहोत, जो लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने खातील.
 
सहसा आवळ्याचा मुरब्बा सर्वानाच आवडतो. तो घरच्याघरी कसा बनवायचा ते आज आपण जाणून घेऊया. ..
 
साहित्य :
 
आवळा - १२
साखर - ३०० ग्राम
पाणी - ३०० मि.ली.
केशर - २-३ काड्या
काली मिरी पावडर - १ छोटा चमचा
वेलची पावडर - १ छोटा चमचा
काळे मीठ - १ छोटा चमचा
 
कृती :
आवळ्याला सर्वप्रथम पाण्याने धून स्वच्छ करून घ्या. आता एका कढईत आवळे घाला आणि त्यात आवळे बुडेल इतके पाणी घाला. आता हे आवळे मऊ होईपर्यंत उकळून घ्या. आवळे मऊ झाले की पाण्यातून बाहेर काढून थंड होऊद्या. थंड झाल्यावर आवळ्याला कापून ते वेगळे ठेऊन द्या. आता एका पॅनमध्ये साखरेचा पाक तयार करा. कढईत साखर आणि पाणी सारख्या प्रमाणात घेऊन ते उकळून घ्या. याचा एकतारी पाक तयार करा. पाक तयार झाला की त्यात आवळ्याचे तुकडे घाला. आता १५ ते २० मिनिटांपर्यंत या मिश्रणाला ढवळत राहा. हे मिश्रण घट्ट आणि चिकट होईपर्यंत ढवळा. मिश्रण घट्ट झाले की मग त्यामध्ये केशर, वेलची पावडर, काळी मिरी पावडर, आणि काळे मीठ घालून मिक्स करा. आता या मिश्रणाला रात्रभर झाकून ठेऊन द्या. दुसऱ्या दिवशी याचा रंग बदलून गडद आणि घट्ट झालेला दिसेल. आता तयार मुरब्बा तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये ठेऊ शकता.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.