US Shooting: व्हर्जिनिया वॉलमार्टमध्ये अंदाधुंद गोळीबार; अनेकांचा मृत्यू

    23-Nov-2022
Total Views |

shooting at us walmart store
(Image Source : Internet)
 
वॉशिंग्टन :
अमेरिकेत पुन्हा एकदा भ्याड गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील व्हर्जिनियातील वॉलमार्टमध्ये मंगळवारी रात्री उशिरा एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झाला नसून गोळीबार करणारा बंदूकधारी व्यक्ती देखील यात मारला गेला आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चेसापीक पोलिसांचे प्रवक्ते एमपीओ लिओ कोसिंस्की यांनी ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हर्जिनिया प्रांतातील चेसापीक शहरात स्थित असलेल्या एका वॉलमार्टमध्ये हा अंदाधुंद गोळीबार झाला. चेसपीक येथे संध्याकाळी उशिरा झालेल्या या घटनेत पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या शूटरलाही ठार केल्याची माहिती आहे. या घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले आहेत, याची संख्या अद्याप अस्पष्ट असून ती वाढण्याची शक्यता आहे, असे वॉलमार्ट आणि चेसापीक पोलिस विभागाने सांगितले आहे.
दरम्यान, हा गोळीबार वॉलमार्ट स्टोअरच्या व्यवस्थापकाने केल्याचा दावा अनेक वृत्तांमध्ये केला जात आहे. त्याने आधी कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली, असे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.
कोलोरॅडोच्या घडली होती अशीच घटना
गेल्या काही दिवसांपूर्वी कोलोरॅडो येथे अशीच गोळीबाराची घटना घडली होती. येथील एलजीबीटीक्यू नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू झाला होता, तर १८ जण जखमी झाले होते.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.