कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजाराला आग; कोट्यवधींचा माल जळून खाक

    23-Nov-2022
Total Views |

fire in kalamna
 
 
नागपूर :
नागपुरातील कळमना बाजारात बुधवारी मंगळवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत बाजार समितीत ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मिरच्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्यांनी घटनास्थळ गाठून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमना कृषी बाजार समितीच्या परिसरात मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास आगीच्या ज्वाला दिसल्या. आग लागल्याचे लक्षात येताच उपस्थित लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि ४-५ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.
नुकसान भरपाईची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, बाजारातील यार्डात ४ हजार पोटे भरलेले होते. त्यात प्रामुख्याने ७ ते १० ब्लॉक व व्यापाऱ्यांचा माल होता. या आगीत सुमारे ५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या या घटनेत एकाच वेळी आग कशी काय असू शकते? आगीमागील कारण काय? असे अनेक प्रश्न/ शंका व्यक्त केल्या जात आहेत. या आगीसाठी कृषी बाजार निर्मिती समितीला जबाबदार धरून व्यापाऱ्यांनी समितीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.