झोमॅटो १०० कर्मचाऱ्यांची छाटणी करणार

21 Nov 2022 11:22:48

zomato
image source internet
 
बंगळूरू:
घर बसल्या फूड ऑर्डर करण्यसाठी हल्ली लोक झोमॅटो सारख्या फूड डिलिवरी कंपन्यांवर आपला विश्वास दर्शवित आहेत. पण जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा परिणाम खाजगी क्षेत्रावर स्पष्टपणे दिसत आहे. ट्विटर आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटानंतर आता फूड अ‍ॅग्रिगेटर झोमॅटोनेही कर्मचाऱ्यांची छाटणी केली आहे.
झोमॅटोने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. झोमॅटोने जवळपास १०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करणार आहे. हे कर्मचारी कंपनीच्या उत्पादन, टेक, कॅटलॉग आणि मार्केटिंग अशा विविध विभागांमध्ये
योगदान देत आहेत. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यापैकी सुमारे ३ टक्के कामगारांना कामावरून काढून टाकले जाणार आहे.
झोमॅटोमधील व्यवस्थापनात सातत्याने राजीनामे येत असतानाच आता कर्मचारी कपातीची बातमी समोर आली आहे. कंपनीचे
सहसंस्थापक मोहित गुप्ता यांनी मागील शुक्रवारीच आपले पद सोडले.गेल्या काही दिवसांत झोमॅटोच्या व्यवस्थापनातील हा तिसरा राजीनामा होता. त्याच आठवड्यात, कंपनीचे न्यू एनिशिएटिव्ह प्रमुख राहुल गंजू यांनी राजीनामा दिला. याशिवाय इंटरसिटी लिजेंड सव्र्हिसेसचे प्रमुख सिद्धार्थ झंवर यांनी आठवडाभरापूर्वी कंपनी सोडली.
Powered By Sangraha 9.0