भयावह! इंडोनेशियात जोरदार भूकंप; ४४ जणांचा मृत्यू; ७०० लोक जखमी

21 Nov 2022 16:26:47

earthquake hits indonesia
(Image Source : Internet)
 
जकार्ता :
इंडोनेशियात सोमवारी भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरले. राजधानी जकार्ता येथील जावा बेटावर आज माध्यम स्वरूपाचे आणि रिश्टर स्केलवर ५.६ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. या भूकंपामुळे जाकार्तामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची बातमी समोर आली आहे. जावामध्ये झालेल्या भूकंपामुळे जवळपास ४४ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ७०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच भूकंपामुळे येथे भूस्खलन आणि इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती तेथील एका स्थानिक अधिकाऱ्याने दिली आहे.
 
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या भूकंपाचे केंद्र पश्चिम जावाच्या सियानजुर प्रदेशात १० किलोमीटर खोलीवर होता. त्यामुळे येथे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घाबरलेले रहिवाश्यांनी रस्त्यावर धाव घेतली. या भूकंपात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती देखील लोकल अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
चिंताजनक बाब म्हणजे अधिकाऱ्यांनी संभाव्य आफ्टरशॉकचा इशारा दिला असून यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ज्या भागात भूकंप झाला तो भाग दाट लोकवस्ती, भूस्खलनाचा धोका असलेला आणि कच्च्या बांधकामाच्या घरांचा आहे. भूकंपानंतर बचावकर्ते कोसळलेल्या इमारतींमधून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Powered By Sangraha 9.0