24 वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्ट मिट क्रीडा महोत्सव

    20-Nov-2022
Total Views |
 
krida mahostav
image source internet
 
अमरावती:
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे 3 ते 07 डिसेंबर दरम्यान होणा-या 24 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्टस् मिट क्रीडा महोत्सव -2022 अॅथलेटिक्स स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा महिला व पुरुष संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर 21 ते 29 नोव्हेंबर 2022 दरम्यान होणार आहे.
 
महिला संघ (अॅथलेटिक्स)
 
महिला खेळाडूंमध्ये श्री आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय, अकोलाची कु. वैष्णवी लवाळे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. प्रियंका कुंडू, बॅरिस्टर आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेराची कु. प्रियंका पवार व कु. प्रियंका गुजर, विदर्भ महाविद्यालय, बुलडाणाची कु. एकता राजपुत, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशिमची कु. शितल ठाकूर, श्रीमती आर.डी.जी. महाविद्यालय, अकोलाची कु. अंजली वि·ाकर्मा, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची कु. दीपा उईके, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. जलवंती जामुनकर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची कु. दिव्या ठाकरे, महात्मा फुले महाविद्यालय, वरूडची कु. विशाखा तुमाने व कोमल वानखडे, वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणीची कु. पार्बती कासदेकर, सिताबाई कला महाविद्यालय, अकोलाची कु. निकिता वंदे, श्रीमती आर.डी.जी. महिला महाविद्यालय, अकोलाची कु. गायत्री मेश्राम हिचा समावेश आहे. खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे दिनांक 21 ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.

पुरुष संघ (अॅथलेटिक्स)
पुरुष खेळाडूंमध्ये बॅरिस्टर आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेराचा ओम टाकसाळकर, आकाश इंदुरकर व पार्थ सावरकर, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा त्रिशंगकू, सुजित कुलाल, राज महातो, अशोक प्रजापती व मेहुलकुमार सिंह, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळचा कुणाल चौधरी, महात्मा फुले महाविद्यालय, वरूडचा शुभम तिवसकर, कला महाविद्यालय, बुलडाणाचा निलेश सोळंके, संत गाडगे महाराज महाविद्यालय, वलगावचा प्रशिक थेटे, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळचा निशांत चव्हाण, यशवंतराव चव्हाण शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मंगरुळपीरचा शुभम इंगोले याचा समावेश आहे. पुरुष खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे होणार आहे.
 
सर्व खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.