एअर फेस्ट २०२२ ची झलक
नागपूरमध्ये भारतीय हवाई दलाद्वारे 'एअर फेस्ट २०२२' च्या अंतिम 'एअर शो' चे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अंतिम एरो शो चा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

दरम्यान वायुसेनेच्या वीरांनी आकाशात अनोखे पराक्रम दाखवले.

यावेळी सूर्यकिरण एरॉबॅटिक टीम आणि सारंग हेलीकॉप्टर्सने उत्कृष्ट अशा कसरती दाखवून नागपूरकरांचे मन जिंकले.
'एअर फेस्ट २०२२' दरम्यान एअर वॉरियर्स ड्रिल, एनसीसी ग्यायडर्स टीम, पॅराट्रूपर्स यांचीही प्रात्यक्षिके बघायला मिळाली.
--------------------------------------------------------
-------------------------------------------------------
--------------------------------------------------------
भारतीय हवाई दलाच्या विविध पैलूंचे प्रदर्शन करणे आणि नागपूरातील तरुणांमध्ये रोमांचक करिअरसाठी भारतीय वायुसेनेची निवड करण्यासाठी प्रेरित करणे हा या एअर फेस्टमागील उद्देश होता.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.