Vastu Tips : पितळेचा सिंह घरात का ठेवावा? जाणून घ्या

    17-Nov-2022
Total Views |

brass lion
(Image Source : Internet)
 
नागपूर :
वास्तुशास्त्र म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा भाग. प्राचीन काळापासून भारतीयांना वास्तुशास्त्रावर विश्वास आहे. घराच्या बांधणीपासून ते घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्व वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. एखादी वस्तू योग्य ठिकाणी न ठेवल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असेही देखील सांगितले जाते. याशिवाय वास्तुशास्त्र बऱ्याचदा लोकांना त्यांच्या जीवनात होत असलेल्या समस्यांचे समाधानही करून देतो. त्यामुळे बऱ्याच लोकांचा वास्तुशास्त्रावर विश्वास असून ते घरात पितळेचा सिंह ठेवतात.
पितळेचा सिंह घरात ठेवण्याचे फायदे
वास्तुशास्त्रानुसार, पितळेच्या सिंहाची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढतो, अशी मान्यता आहे. याबरोबरच कुटुंबियांच्या मनात एकमेकांबद्दल एकोप्याची भावना वाढते आणि त्यांना कधीही पराभवाचा सामना करावा लागत नाही. त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा करिअरमध्ये देखील प्रगती होते. घरात पितळेचा सिंह ठेवल्याने घरातील लोकांच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. घरात सकारात्मकता वाढते.

पितळेच्या सिंहामध्ये बृहस्पतीचा वास
घरात पितळेचा सिंह ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. हे पितळ धातूपासून तयार झाल्यामुळे यात गुरु गुरु ग्रहाचा वास असतो, असे म्हणतात. ज्या लोकांच्या कुंडलीत बृहस्पती कमकुवत आहे, ते आपल्या घरात पितळेच्या सिंहाची मूर्ती ठेवतात. यामुळे कुंडलीतील दोष दूर होतो, असे मानतात.
या दिशेत ठेवा पितळेचा सिंह
वास्तुशास्त्रानुसार, लाभासाठी पितळेचा सिंह योग्य दिशेला ठेवणे अत्यंत आवश्यक असते. म्हणून हा सिंह उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवाव. तसेच या मूर्तीचा चेहरा घराच्या मध्यभागी असावा. याशिवाय पितळी सिंहावर धूळ असू नये, तो नेहमी स्वच्छ असावा याबद्दल काळजी घ्यावी. असे नसल्यास त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो, असे म्हणतात.
 
 
 
Disclaimer : या लेखातील माहितीची आणि कथांच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ पौराणिक कथा/ शास्त्रानुसार एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे असून वाचकाने ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. अभिजीत भारत या लेखात लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीवर दावा करत नाहीत.