आता व्हॉट्सॲप कॉलही करता येईल रेकॉर्ड; कसे ते जाणून घ्या

    16-Nov-2022
Total Views |

whatsapp call recording app
 
नागपूर :
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमुळे आपल्या मित्र आणि आप्तस्वकीयांनशी, प्रियजनांशी जुळून राहणे हे अगदी सोपे झाले आहे. लहान मुलांपासून तर घरच्या वडीलधाऱ्या माणसांपर्यंत आज सगळेच जण व्हॉट्सॲप चा वापर करतात. कोरोनाकाळात तर शाळेबरोबर, ऑफिस सुद्धा व्हॉट्सॲप वर सामावले होते. अशात सर्वच लोक व्हॉट्सॲप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलचा वापर करतात. व्हॉट्सॲप वर करण्यात येणारे व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग शक्य नव्हती. पण आता हे कॉल रेकॉर्ड करणे शक्य होणार आहेत. ते कसे करायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती.
 
व्हॉट्सॲपवर सध्या कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कुठले पर्याय उपलब्ध नाही आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला व्हॉट्सॲप व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करायचे असतील तर तुम्हाला थर्ड पार्टी ॲपचा उपयोग करावा लागेल. हे ॲप तुम्हाला प्लेस्टोर वरून डाऊनलोड करता येईल.

व्हॉट्सॲप व्हॉइस कॉल असे करा रेकॉर्ड
अँड्रॉइड फोनमध्ये कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही 'क्यूब कॉल' ॲपचा वापर करू शकता. ॲप इंस्टाल केल्यानंतर व्हॉट्सॲप ओपन करा. आता व्हॉट्सॲप कॉल करण्यासाठी तुम्हाला एक वेगळा क्यूब कॉल विजेट दिसणार. आता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हॉट्सॲपवरील तुमचा प्रत्येक व्हॉइस कॉल आपोआप रेकॉर्ड करता येईल.
 
तर आयफोनवर व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करणे थोडे कठीण आहे. यासाठी तुम्हाला मॅक कॉम्पुटरवर क्विक टाईम ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. आपल्याला आयफोनला मॅकशी कनेक्ट करा आणि ॲप ओपन करा. यानंतर, फाईल ॲप्लिकेशनवर जाऊन न्यू ऑडिओ रेकॉर्डिंग पर्याय निवडावा लागेल आणि आयफोन देखील निवडावा लागेल. यानंतर व्हॉट्सॲपवर तुम्हाला एक नवीन रेकॉर्ड बटन दिसेल. कॉलिंग दरम्यान त्यावर टॅप करून, तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता.
 
व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल असे करा रेकॉर्ड
अँड्रॉइड आणि आयओएस डिवाइसमध्ये असे फिचर आहे ज्याद्वारे व्हिडीओ कॉल सहज रेकॉर्ड करता येते. या फीचरचे नाव आहे स्क्रीन रेकॉर्डिंग. आजकाल बऱ्याच स्मार्टफोनमध्ये हे फिचर उपलब्ध असते. तुमच्या फोनमध्ये जर हे फिचर नसेल, तर तुम्हाला प्लेस्टोर मधून DU रेकॉर्डर ॲप डाऊनलोड करावे लागेल. हे ॲप ओपन केल्यानंतर आवश्यक परवानग्या मागण्यात येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल सहजपणे रेकॉर्ड करता येईल. आयफोनमध्ये स्कीन रेकॉर्डिंगचा पर्याय असतो. ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करू शकता.
 
टीप : कोणताही नवीन ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती वाचून घ्यावी नंतरच वापर करावा की नाही करावा हे ठरवावे.
 
 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.