पत्रकारिता दिन का साजरा केला जातो? त्यामागचे उद्देश जाणून घ्या

    16-Nov-2022
Total Views |

national journalism day
 (Image Source : Internet)
 
नागपूर : 
पत्रकारिता समाजाचा तो आरसा आहे, जी समाजातील प्रत्येक चांगली वाईट घटना जशीच्या तशी वृतांकनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्यास मदत करतो. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना जागरूक करण्याचे काम पत्रकार करतात. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी लोकांसमोर खर ते आण्याची जबाबदारी पत्रकाराची असते.
राष्ट्रीय पत्रकारिता दिवस का साजरा केला जातो?
पहिल्या प्रेस कमिशनने १९५६ मध्ये भारतातील पत्रकारितेच्या नैतिकतेचे आणि प्रेसच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी समितीची कल्पना केली होती. त्यानंतर १० वर्षानंतर म्हणजेच ४ जुलै १९९६ रोजी प्रेस काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. ज्याने १६ नोव्हेंबर १९९६ रोजी आपल्या कार्याची सुरुवात केली. तेव्हापासून भारतात दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो.

national journalism day 
 
प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची ज्याचे काम भारतीय पत्रकारांनी पुरवलेल्या अहवालाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे आहे. भारतीय पत्रकार कुठल्याही बाह्य घटकांनी प्रभावित होऊ नये याची खात्री करण्यासाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया समाजात नैतिक वॉचडॉग म्हणून काम करते. पत्रकार हा समाजातील एक अविभाज्य भाग असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे समाजात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांना सत्याशी जोडून ठेवणे, याबरोबरच समजत सुधारना आणणे ही महत्वाची कामे करतात.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.