भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले जपानमधील टोबा शहर!

    14-Nov-2022
Total Views |

earthquake hit toba of japan
(Image Credit: Twitter)
 
टोकियो :
मध्य जपानमधील टोबा शहर सोमवारी भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या टोबा शहरात झालेल्या भूकंपाचे धक्के टोकियो आणि इतर शहरांमध्येही जाणवले आहेत. मात्र, अद्याप सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
जपानच्या हवामान खात्याने एका निवेदनात म्हटले आहे की, भूकंपाचे केंद्र मध्य माई प्रीफेक्चरपासून सुमारे ३५० किलोमीटर (२१७ मैल) खोलीवर होते. तसेच सोमवारी दुपारी १.३८ वाजताच्या सुमारास हा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे शनिवारी संध्याकाळी उत्तराखंडमधील पिथौरागढच्या पूर्व-दक्षिण-पूर्वेस १०१ किलोमीटर अंतरावर नेपाळमध्ये ५.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये जोरदार हादरे जाणवले होते.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.