उद्योजक बनू इच्छिणा-यासाठी या योजनेंतर्गत मिळू शकते 15लाख रुयांपर्यंतचे कर्ज, ही आहेत आवश्यक कागदपत्रे

11 Nov 2022 12:52:29


bussnis
image source internet
 
नागपूर,
जिल्हयातील आर्थिक दुर्बल घटकातील उद्योजक बनू इच्छिणा-या व तशी क्षमता असलेल्या मराठा व ज्या प्रवर्गाकरीता इतर स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही. अशा तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना या तीन योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये आधी घेतलेल्या कर्जाची मर्यादा 10 लाख एवढी होती ती आता 15 लाख करण्यात आलेली आहे.
लाभार्थ्याने बँकेमार्फत घेतलेल्या 15लाखापर्यंतच्या कर्जावर 12 टक्के व्याज दराने 4.5 लाखाच्या मर्यादित व्याजाची रक्कम व गट कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये गटात जास्तीत जास्त रु. 50 लाख पर्यंतच्या बँकेमार्फत देण्यात आलेल्या उद्योग उभारणी कर्जदर जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराने 15 लाख रुपयांच्या मर्यादित व्याजाची रक्कम लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. गट प्रकल्प कर्ज योजनेमध्ये 10 लाखापर्यंत बिन व्याजी कर्ज शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) यांना शेतीपूरक व्यावसायाकरिता महामंडळामार्फत देण्यात येईल.
योजनेसंबंधीची सविस्तर माहिती व शासन निर्णय महामंडळाच्या www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पात्रता प्रमाणपत्र (LOI) साठी आवश्यक असणारी कागदपत्रे :
उमेदवार महिला व पुरुष 18 ते 60 वयोगटातील असावा.आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वतःच्या ई-मेल आयडीसह), रहिवासी पुरावा : (रहिवासी दाखला/ लाईट बैल/रेशनकार्ड/गॅस बिल/ बैंक पास बुक), उत्पन्नाचा पुरावा (उत्पन्नाचा दाखला/आयटी रिटर्न जर लग्न झालेले असल्यास पती-पत्नीचे व लग्न झाले नसल्यास स्वत:चे आयटी रिटर्न अनिवार्य) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8लाख पेक्षा कमी असावे. जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0