मोठा निर्णय! सरकारी नोकर भरतीवर लावलेले निर्बंध हटविले

    01-Nov-2022
Total Views |

recruitment
(Image Source : Internet)
 
मुंबई :
राज्यात ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने योग्य ते पाऊल उचलत नोकर भरतीवर लावलेले सर्व निर्बंध हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभरात ७५ हजार पदांवर थेट भरती व्हावी, अशी राज्य सरकारची इच्छा आहे. या दृष्ट्या सरकारने बंदी हटवण्याचा आदेश जारी केला आहे.
ज्या विभागात किंवा कार्यालयात सुधारित कर्मचारी पॅटर्न तयार करण्यात आला आहे, त्यांना सर्व रिक्त पदे थेट भरतीच्या कोट्याद्वारे भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ज्या विभागात किंवा कार्यालयात हे पॅटर्न अद्याप तयार करण्यात आलेले नाही, तेथे श्रेणी ए, बी, आणि सी (ड्राइव्हर आणि श्रेणी डी संवर्गातील पदे वगळता) च्या थेट भरती कोट्याद्वारे ८० टक्के रिक्त पदांवर नियुक्तीसाठी परवानगी देण्यात आली आहे. सरकारी भरतीतून काढलेली बंदी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ पर्यंतच लागू असेल, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर भरती प्रक्रिया वित्त विभागाने ३० सप्टेंबर २०२२ रोजी केलेल्या आदेशानुसार केली जाईल.
३० सप्टेंबर रोजी शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार, सुधारित कर्मचारी पॅटर्न पूर्ण करणाऱ्या विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्षेत्राधिकारातील रिक्त पदांवर १०० टक्के नियुक्त्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच इतर संवर्गातील ५० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.