Garba Night Day 1 : 'गरबा नाईट २०२२' ची महाआरतीने सुरुवात

    08-Oct-2022
Total Views |
garaba nights 2022
 
नागपूर :
अभिजीत भारत न्यूजच्या वतीने दक्षिण नागपुरात तीन दिवसीय भव्य 'गरबा नाईट 2022' चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अभिजीत भारतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) इनु मजुमदार आणि अभिजीत रियाल्टर्स ॲण्ड इन्फ्राव्हेंचर्सच्या व्यवस्थापकीय संचालक अभिजीत मजुमदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महाआरतीने झाली.
   
garba nights 2022 day 1
 
बेसा चौक येथील 'दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी' मध्ये रविवार, 2 ऑक्टोबर पासून तीन दिवसीय 'गरबा नाईट-2022' चे आयोजन करण्यात आले होते.
 
garba nights 2022 day 1
 
पारंपरिक पेहरावात भाविकांनी गरब्याच्या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा केला.
 
garba nights 2022 day 1
 
 शहरातील विविध भागातून आलेले लोक गुजराती, महाराष्ट्रीयन अशा नानाविध प्रकारच्या पारंपरिक पेहरावात दिसून आले.
 
garba nights 2022 day 1
 
'नगाडे संग ढोल बाजे' च्या तालावर भाविकांनी केला गरबा. भारतीय संस्कृतीचे एक मनमोहक दृश्य
 
garba nights 2022 day 1
 
सर्व प्रकारचे भेद विसरून पूर्णतः भक्तिभावात तल्लीन भाविक गरबा करण्यात मग्न
 
garba nights 2022 day 1
 
अंबाबाईच्या वेशात नारीशक्तीचे एक नवीन स्वरूप
 
garba nights 2022 day 1
 
लहान मुल देखील पारंपारिकरित्या वेशभूषेत तयार होऊन गरबा नाईटमध्ये उत्साहाने सहभागी झाले.
 
garba nights 2022 day 1
 
 'गरबा नाईट-2022' ला पहिल्याच दिवशी लोकांचा मोठा प्रतिसाद. नागपूरकरांचे भरभरून प्रेम लाभले.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.