एलोन मस्क येताच ट्विटरमध्ये वाहणार बदलाचे वारे; हे नवे बदल युजर्स ला देतील झटका?

    31-Oct-2022
Total Views |
twitter latest update (Image Source : Internet)
 
न्यूयॉर्क :
 
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हा चर्चेचा विषय बनला आहे. एप्रिल २०२२ पासून सुरु असलेली एलोन मस्क आणि ट्विटर मधील डील शेवटी २७ ऑक्टोबर रोजी पूर्णत्वास आली. ट्विटरला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर मस्कने ट्विटरच्या पॉलिसीमध्ये बरेच मोठे बदल केले आहेत. ज्याने 'एलोन मस्क आल्यामुळे ट्विटरमध्ये  बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे' असे म्हटल्या जात आहे.
 
काय काय होणार बदल?
 
मिळालेल्या माहितीनुसार एलोन मस्क आता ट्विटर वर 'पे फॉर प्ले' वेरिफिकेशन पद्धतीची सुरुवात करणार आहेत. म्हणजेच ट्विटरवर ब्लू टिक साठी युजर्सला आता पैसे द्यावे लागेल. या पे फॉर प्ले वेरिफिकेशन पद्धती अंतर्गत युजर्सला ब्लू टिक साठी दरमहीने २० डॉलर म्हणजेच जवळपास १,६४६ रुपये द्यावे लागतील. सोबतच रिपोर्ट्स च्या अनुसार ट्विटरच्या मंथली सबस्क्रिप्शन प्लॅन मध्ये सुद्धा बदल होणार आहेत.
 
 
ट्विटरच्या संपूर्ण वेरिफिकेशन प्रक्रियेमध्ये सुधारणा केली जात असल्याचे एलोन मस्क एका ट्विट द्वारे सांगितले आहे. एलोन च्या मते ट्विटरमध्ये बदल करण्यामागे त्यांचा उद्देश्यातील महत्वाचा भाग म्हणजे 'फ्री स्पीच' आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.