Diwali 2022 : दिवाळीनिमित्ताने अशी बनवा फुलांची रांगोळी

22 Oct 2022 21:10:41

flower rangoli (Image Source : Pinterest)
 
आपल्या देशात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. देशभरात दिवाळीची धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत.

flower rangoli (Image Source : Internet)
 
दिवाळी किंवा दीपावली हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण असून यावेळी घरात आणि घराबाहेर दिवे लावून तसेच घरासमोर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. सध्या साधी रांगोळी घालण्यापेक्षा फुलांच्या रांगोळीचा क्रेझ सर्वत्र वाढला आहे.

flower rangoli (Image Source : Internet)
 
त्यामुळे तुम्ही देखील अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फुलांची सुंदर रांगोळी तयार करू शकता. झेंडूच्या फुलांच्या मदतीने तुम्ही सुंदर स्वस्तिकची रांगोळी बनवू शकता आणि त्याला गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवू शकता. त्यानंतर या स्वतिकभोवती चार गोल बनवा आणि त्यामधोमध तुम्ही दिवे देखील ठेऊ शकता.

flower rangoli (Image Source : Internet)
 
आणखी दुसऱ्या प्रकारे फुलांची रांगोळी बनवायची झाली तर, सर्वप्रथम रांगोळी घालायची त्या ठिकाणी मध्यभागी एक समई ठेवा. या समईभोवती प्रथम झेंडूच्या फुलांच्या मदतीने वर्तुळ बनवा. त्यानंतर जरबेरा, पारिजातक, झेंडू, गुलाबाच्या पाकळ्या, झेंडू या फुलांनी वर्तुळ बनवा. शेवटी रांगोळीच्या भोवती दिवे ठेवा.

flower rangoli (Image Source : Internet)
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
Powered By Sangraha 9.0