आजपासून Tokenization लागू; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

    01-Oct-2022
Total Views |
 
tokenization  (Image Source : Internet)
 
नागपूर : 
आजपासून भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कार्ड टोकनायझेशनचे नियम लागू केले आहेत. ग्राहकांना बँकेकडून याबद्दल मेसेजही येत आहेत. पण कार्ड टोकनायझेशन नेमके काय आहे? याचा नफा व तोटा काय आहे, तसेच याची प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे.
 
रिजर्व बँक ऑफ इंडियाने १ ऑक्टोबरपासून कार्ड-ऑन-फाईल टोकनायझेशनचा नवीन नियम लागू केला आहे. RBI नुसार, कार्डने ट्रान्झॅक्शन करण्याच्या अनुभवात सुधार होणार आहे. ग्राहकांना बँकेकडून ३० सप्टेंबरपर्यंत टोकनायझेशन करून घेण्याचे मेसेजही येत होते. अशात ग्राहकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे तो, टोकनायझेशन म्हणजे काय? याची प्रक्रिया काय आहे? याबद्दलचा नफा व तोटे काय आहेत? चला तर जाणून घेऊया टिकनायझेशनबद्दलची संपूर्ण माहिती.
 
काय आहे टोकनाइझेशन :
टोकनायझेशन ही एक अशी पद्धत आहे, ज्यात कार्डधारकाच्या संवेदनशील डेटाची ओळख रद्द केली जाते. ते या संवेदनशील डेटाचे रूपांतर एका सांख्यिक स्ट्रिंगमध्ये करते. याप्रकारे टोकनायझेशन हे मूळ डेटा अस्पष्ट बनवते. त्यामुळे डेटाचे एक्सपोजर जरी झाले, तरी ते वाचता येत नाही. सध्या कार्डचा डेटा लीक झाल्याचे आणि त्यामुळे होण्याऱ्या फ्रॉड चे प्रकरण खूप वाढले असल्याने RBI चा नवीन तोडगा आहे.

हे आहेत टोकनाइझेशनचे फायदे :
नवीन व्यवस्थेनुसार, रिझर्व्ह बँकेने पेमेंट कंपन्यांना ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा डेटा संग्रहित करण्यास मनाई केली आहे. पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, ज्याचे नाव टोकन आहे. ही टोकन्स युनिक असतील आणि एकाच टोकनसह अनेक कार्डांसाठी वापरली जातील. तसेच टोकनाइझेशन च्या मदतीने फ्रॉडच्या वाढत्या संख्येवर आळा घालता येईल. हे नवीन नियम ग्राहकांच्या कार्डच्या सुरक्षेसाठी बनवले आहे.
 
असे करा क्रेडिट/डेबिट कार्डचे टोकनाइझेशन :
कार्ड टोकन करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती नुकतीच रिझर्व्ह बँकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे दिली होती. घरी बसल्या बसल्या तुम्ही फक्त या ६ स्टेप्स ने सहजपणे आपल्या कार्डचे टोकनाइझेशन करू शकता.
१. सर्वप्रथम कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईट किंवा ऍप ओपन करा. आता सामान्य खरेदी करण्यासाठी एखादे प्रॉडक्ट सिलेक्ट करून पेमेंट ऑपशन सुरु करा.
२. चेक आउट करत असताना आधीपासुन सेव्हड डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती भरा.
३. आता तुम्हाला 'secure your card as per RBI guidelines' किंवा 'tokenize your card as per RBI guidelines' असा ऑप्शन दिसेल. या ऑप्शन ला निवळा.
४. हे ऑप्शन निवळल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर किंवा ई-मेल वर ओटीपी येईल. हे ओटीपी सबमिट करा आणि पेमेंट करा.
५. इथेच तुम्हाला 'जनरेट टोकन' चा ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करा. लगेच तुमच्या कार्डचे टोकन जनरेट होईल आणि तुमच्या कार्डच्या माहितीव्यतिरिक्त हे टोकन त्या वेबसाईट/ऍप वर सेव्ह होईल.
६. आता जेव्हा तुम्ही पुन्हा त्याच वेबसाईट/ऍप वर जाऊन बघाल तर तुम्हाला तुमच्या कार्डचे फक्त शेवटचे ४ अंक दिसणार. हे ४ अंक या साठी दाखवले जाते जेणेकरून तुम्हाला तुमच्या सेव्हड १ पेक्षा जास्त कार्डमध्ये अंतर समजेल.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.