
Image Source:(Internet)
इंफाळ: मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारामुळे तणावाचे वातावरण अद्यापही पेटले आहे.मे 2023 पासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 306 जणांचा मृत्यू, तर 49 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री गोविंदस कोंथौजम यांनी आज, गुरुवारी विधानसभेत दिली.
विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार सपम रंजन सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कोंथौजम यांनी ही माहिती दिली. हे आकडे 31 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या नोंदीनुसार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात गृहमंत्री कोंथौजम म्हणाले की, राज्यात 3 मे 2023 रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 306 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 49 जण अजूनही बेपत्ता आहेत.
या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर 13 फेब्रुवारी 2026 रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर 60 सदस्यांची विधानसभा निलंबित करण्यात आली. यानंतर 4 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली आणि भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना करण्यात आली आहे.