
Image Source:(Internet)
नागपुर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. राज्यातील राजकीय घडामोडी, दुष्काळाची परिस्थिती आणि पक्षाच्या संघटनात्मक रणनीतीवर बैठकीत चर्चा झाली.
यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार यांनी थेट भाष्य केले. आपल्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे त्यांनी आमच्यात यावे. आम्ही कुणाच्यात जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पक्ष म्हणूनच पुढील राजकीय लढाई लढणार,” अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली. पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाची दिशा स्पष्ट झाली आहे.