
Image Source:(Internet)
रायगड : राजीनाम्याच्या मागणीवरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसकडून वारंवार राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचा आरोप करत, ‘काँग्रेस जनता पार्टीने आता आपले नाव बदलून राजीनामा जनता पार्टी करावे,’ अशी खोचक टिप्पणी आठवले यांनी केली.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली. ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. एखाद्या व्यक्तीच्या राजीनाम्याची मागणी करण्यामागे राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सूचित केले.
राजीनामा मागण्यासाठी काँग्रेस आहे का, असा सवाल करत आठवले यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय मुद्द्यांवर विरोधकांकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.